Categories: नांदेड

हदगावच्या कारखानदारीत खा. पाटील यांच्यावर देशमुखांची मात

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः- हिंगोली लोकसभा मतदारसंघ व नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात असलेल्या हदगाव येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया शनिवारी पार पडली.यामध्ये खासदार हेमंत पाटील यांच्याकडील कंपनीने सुद्धा निविदा दाखल केली होती. मात्र अधिकची बोली लावल्यामुळे सदरचा कारखाना हेमंत पाटील यांच्याकडील कंपनीला मिळू शकला नाही. कारखाना खरेदीचे हेमंत पाटील यांचे दुसर्‍यांदा स्वप्न भंगले.तर देशमुखाने खरेदीत पाटील यांच्यावर मात केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

हदगाव येथील भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना युनिट-4 हे अशोक चव्हाण यांच्या ताब्यात होते. मात्र मधल्या काळात अशोक चव्हाण यांनी गाळप थांबविले होते. उस उत्पादक शेतकर्‍यांच्या मागणीवरून गाळप सुरु झाले होते. अचानकपणे कारखाना विक्रीस काढला. यामुळे शेतकर्‍यांना मोइा धक्का बसला. यापूर्वी अशोक चव्हाण यांनी माजी केंद्रीयमंत्री सुर्यकांता पाटील यांच्याकडून 2012-13 साली कारखाना खरेदी केला होता. खरेदीनंतर हुतात्मा जयवंतराव पाटील असे या कारखान्याचे भाऊराव चव्हाण युनिट-4 असे नामकरण झाले होते.

सात ते आठ वर्षांमध्ये हा कारखाना विक्री करण्याची नामुष्की अशोक चव्हाण यांच्यावर आली. त्यामुळे निविदा प्रक्रिया करून या कारखान्याची विक्रीची शनिवार दि. 5 जुलै रोजी पार पडली. खरेदीसाठी पाच निविदा आल्या होत्या. यामध्ये हेमंत पाटील यांनी सुद्धा निविदा सादर केली होती. यासाइी 87 कोटी रुपयांची किंमत टाकण्यात आली होती. मात्र हदगाव तालुक्यातील उद्योजक सुभाष देशमुख व सहकारी यशवंत देशमुख यांनी 92 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावून कारखाना खरेदी केला.

यापूर्वी हेमंत पाटील हे आमदार असताना कलंबर कारखाना खरेदी करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले होते. लोहा-कंधार मतदारसंघाचे तत्कालीन आमदार तथा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तांत्रिक मुद्दाच्या आधारे विक्रीला शासनस्तरावरून बे्रक लावला होता. त्यामुळे सुरुवातील कलंबर कारखाना खरेदीच्या स्वप्नांवर विर्जन पडले. हिंगाली लोकसभा मतदारसंघातील कारखाना ही पुढील राजकारणाची पेरणी म्हणून उत्तम ठरू शकतो, या उद्देशाने खा. हेमंत पाटील यांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाटील हे देशमुखांपुढे बोलीत कमी पडले. 92 कोटी रुपयांना उद्योजक सुभाष देशमुख यांना भाऊरावचे युनिट-4 मिळाले. या कारखान्याच्या माध्यमातून हेमंत पाटील यांना या मतदारसंघात पाळमुळ रोवण्याची संधी नशिबाने दिली नसल्याचे बोलले जात आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago