नांदेड

चांगले दिग्रसकर बिघडून गेले अन बिघडलेले सोनटक्के पुन्हा आले

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- जिल्हा परिषदमध्ये सर्वाधिक बदनामीकारक चर्चा ही समाजकल्याण विभागाची होत असते,परंतु तसे नव्हे,सर्वाधिक भ्रष्टाचाराची लंका शिक्षण विभाग असून येथे अनिमिततेचा कायम महापूर येत असतो.येथील माध्यमिक असो प्राथमिक शिक्षणाधिकारी हे सर्वाधिक आवक काढण्यात सराईत असतात. सुरुवातीला सेवानिष्ठा दाखविणारे हळूहळू मेवा खाण्यासाठीच स्वाक्षरी वापरतात.असाच अनुभव जिल्ह्यातील शाळा संस्थाचालकांना बदलीने लातूर येथे गेलेल्या प्रशांत दिग्रसरकर यांच्या बाबत आला. यापूर्वी वादग्रस्त ठरलेले संदीप सोनटक्के यांनी पुन्हा नांदेड वापसी केली आहे.त्यामुळे चांगले दिग्रसकर बिघडून गेले अन बिघडलेले सोनटक्के पुन्हा आले आहे. अशी  चर्चा सुरू झाली आहे.

नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागास ते माध्यमिक असो की प्राथमिक कोणत्याच शिक्षणाधिकाऱ्याने पदास साजेस काम केले नाही.ग्रामीण भागातील लेकरांच्या शिक्षणाचा दर्जा वाढविण्याकडे लक्ष न देता खासगी संस्था व शिक्षकांचे न होणारे कामेच करण्यात धन्यता मानली.त्यामुळेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचा ऱ्हास झाला तो आज जिल्हा परिषद मधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याकडे गेला आहे.यास शिक्षक व त्या विभागाचे प्रमुख असलेले शिक्षणाधिकारी जबाबदार ठरतात.सुरुवातीला खासगी अनुदानित शाळेसाठी काम केलेले शिक्षणाधिकारी आता इंग्रजी शाळांना खतपाणी घालत सुटले आहेत.याचे फारशे सुतक शिक्षणाधिकाऱ्यांना वाटत नाही,असो विषयांतर होतंय असे ही म्हणता येणार नाही.

प्रशात दिग्रसकर हे अत्यंत चांगला व प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली.मात्र पूर्ण वेळ सीईओ गेल्यानंतर दिग्रसकर यांच्या नैतिकतेचा ऱ्हास होत गेला आणि त्यांच्या वरिष्ठ नादी लागून सखे शेजारी होऊन बसले,त्यात ते बिघडून गेले ते त्यात बदनामीला कारक ठरले. सुखणीकर प्रकरणात नको तितकी बदनामी दिग्रसकर यांची होऊन गेली. फार मानहानी होण्याअगोदर दिग्रसकर यांची बदली झाली ते योग्य झाले म्हणावे लागेल.

दिग्रसकर यांच्या जागी संदीप सोनटक्के हे येणार आहेत. सोनटक्के यांची मोठी बदनामी जिल्हा परिषदमध्ये झाली.तत्कालीन सीईओ अशोक शिनगारे यांनी सोनटक्के यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते.त्यांच्या काळातील चौकशा अजून अपूर्ण आहेत.तेच नांदेडला शिक्षणाधिकारी म्हणून बदलीने आल्याने जिल्हा परिषद सदस्य हे पार नाराज झाले आहेत.या बदली विरोधात आवाज उठविणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी इशारा दिला आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago