नांदेड

नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाची युद्धपातळीवर तयारी

नांदेड,बातमी. 24:-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार 25 जून रोजी “शासन आपल्या दारी” हा भव्य कार्यक्रम अबचलनगर नांदेड संपन्न होत आहे. या कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर पूर्व तयारी केली जात आहे. प्रत्येक लाभार्थ्यांला या कार्यक्रमात विनासायास सहभागी होता यावे यादृष्टीने गटनिहाय नियोजन केले आहे. उष्णता व इतर बाबी लक्षात घेता मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्यासह इतर व्यवस्था काटेकोरपणे करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी सर्व गटनिहाय अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात “शासन आपल्या दारी” या अभियानाच्या पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय दंडाधिकारी विकास माने, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख गजानन पाटील, मराठवाडा प्रमुख बाबासाहेब थेटे व इतर विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

इतर जिल्ह्यातील कार्यक्रमांचा अनुभव पाठिशी घेवून नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे मिनिट टू मिनीट व शहरात येणाऱ्या वाहतुकीचे नियोजन पोलीस व परिवहन विभागाने केले आहे. हा कार्यक्रम अधिकाधिक लोकसहभागातून शासकीय योजनांचा महाउत्सव बनेल, असा विश्वास अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी व्यक्त केला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago