Categories: नांदेड

दलिवस्तीसंबंधी याचिका उच्च न्यायालयाने फे टाळली

नांदेड,बातमी24ः– बहुचर्चित दलितवस्ती विकास निधीच्या आदेशासंदर्भात भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सौ.पुनम पवार यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खारीज केली आहे. त्यामुळे दलितवस्ती विकासाच्या निधीबाबत सुरु असलेल्या चर्चेंना पुर्णविराम मिळाला आहे.

दलितवस्ती विकास निधीसंदर्भातील 51 कोटी रुपयांच्या आदेशावर आक्षेप घेत पुनम पवार यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 3 जून रोजी सुनावणी झाली होती. यात तारीख वाढवून देण्यात आली होती. यावर शुक्रवार दि. 19 जून रोजी सुनावणी झाली. यात सरकारी पक्षाकडून अ‍ॅड.व्ही. डी. साळुंके यांची युक्तीवाद करताना सदरच्या दलितवस्ती विकास निधीचे कामे सुरु झाली, असून कामाची प्रशासकीय मान्यता व अ‍ॅडव्हान्सची रक्कम देण्यात आली आहे.

यावर न्यायमुर्ती गंगापुरवाला व न्यायमुर्ती आवचट यांनी कामे सुरु झालेली असतील, तर यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे हे प्रकरण बंद करण्यात यावे. असे आदेशित केले असल्याचे समाजकल्याण सभापती अ‍ॅड.रामराव नाईक यांनी सांगितले.
—–
सत्याचा विजयी- अ‍ॅड. नाईक
दलितवस्ती आदेश काढताना काटेकारेपणे अंमलबजावणी करण्यात आली. वंचित वस्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र दलितवस्तीमधील वंचित वस्त्यांचा विकास होऊ न देण्याची भूमिका पुनम पवार यांनी घेतली. अखेर न्यायालयाने सुद्धा यावर शिक्कामोर्तब केले. एकाप्रकारे दलितवस्तीच्या कामात खोडा घालणार्‍यांना ही मोठा दणका आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago