नांदेड

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष प्रलंबित होता,51 सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी स्वरूपात समुपदेशन पद्धतीने पदस्थापणा देण्यात आली आहे. याकामी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढला.त्यामुळे आदिवासी भागातील शिक्षकांच्या रिक्त पदाचा निर्माण झालेला विषयी प्रशासनाची डोकेदुखी ठरला होता.शिवाय विद्यार्थी यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता.मात्र सदरची रिक्त पदे भरण्यात आल्याने आगामी काळात विद्यार्थी याचे गुणात्मक नुकसान टळणार आहे.

मागील काळात शासनाने पात्र अभियोग्यता धारक शिक्षक यांची शासनाकडून निवड करण्यात आली होती,परंतु काही विद्यार्थी यांनी यावर आक्षेप घेऊन त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती, त्यामुळे न्यायालयाने सादर नियुक्तीस स्थगिती दिली होती ,परिणामी शिक्षका अभावी पेसा क्षेत्रातील विद्यार्थी गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत होता. या सगळ्या बाबीची गंभीरता पूर्वक नोंद घेत मीनल करणवाल यांनी यासंबंधी
शुक्रवार दि.6 रोजी एकूण 51 सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्त्वावर समुपदेशनाने पेसा क्षेत्रामध्ये पदस्थापना देण्यात आली. यामुळे पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्याच्या गुणवत्तेला संजीवनी मिळणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य, यांनी त्यांचे परिपत्रक दि. १५ जुलै 2024 अन्वये पेसा क्षेत्रातील शिक्षकांचे रिक्त पदावर सेवा निवृत्त शिक्षक यांची २०हजार रुपये प्रती माह मानधनावर तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत आदेशित करण्यात आले.

यासाठी शिक्षण विभाग (प्रा) जिल्हा परिषद नांदेड तर्फे जाहिरातीद्वारे यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.जिल्हा परिषद नांदेड येथे पात्र 121 सेवानिवृत्त शिक्षकाना समुपदेशनासाठी बोलविण्यात आले होते.  मीनल करणवाल, शिक्षणाधिकारीश्रीमती सविता बिरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत समुपदेशन प्रक्रिया पार पडली.यात किनवट तालुक्यातील 28 आणि माहूर तालुक्यातील 23 रिक्त जागांवर सेवा निवृत्त शिक्षक यांची निवड करण्यात आली. समुपदेशन यशस्वी करण्यासाठी  उपशिक्षणाधिकारी गंजेवार,संतोष शेटकर , राघवेंद्र मदनुरकर, गंगाधर राठोड गट शिक्षणाधिकारी किनवट स्निता पोपुलवाड, स्वरुपा फुलारी, महानंदा कल्याणकर, वसुंधरा थोटे अनिल कांबळे शेख युनूस व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले..

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

1 day ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

3 weeks ago

तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे पध्दतीने राबवा- जिल्हाधिकारी

नांदेड,बातमी24:- सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वारंवार भेट देण्याची गरज नसून, त्यांचा…

3 weeks ago