नांदेड, बातमी24ः जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येने बघता-बघता तीन हजाराचा आकडा पार केला आहे. मागच्या महिनाभराच्या काळात जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अडीच हजारांपेक्षा जास्त आली आहे. तसेच मृत्यूचा आकडा ही शंभरीपार महिनाभराच्या काळात झाला आहे.
शुक्रवार दि. 7 ऑगस्ट रोजी एक हजार 459 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये 1 हजार 234 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला तर 182 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 80 व अंटीजनमध्ये 102 जण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 3 हजार 42 एवढी झाल आहे. तर शुक्रवारी 108 बांधितांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 323 झाली, असून आजघडिला उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 590 झाली, असून यातील 85 जणांची प्रकृती गंभीर आहे.
——-
पाच जणांचा मृत्यू
हदगाव तालुक्यातील तामसा येथील 75 वर्षीय पुरुषाचा, नांदेड येथील भावसार चौकात राहणार्या 60 वर्षीय पुरुष, कंधार येथील काझी मोहल्ला भागातील 42 वर्षीय महिलेचा, मुखेडमधील मामीन गल्ली राहणार्या 86 वर्षीय पुरुष व एम.व्ही.एम कॉलनीत राहणार्या 52 वर्षीय महिलेचा अशा पाच जणांचा मृत्यू कालच्या तारखेत म्हणजे,दि. 6 रोजी झाला आहे.
——
आरटी-पीसीआर चाचणी अहवाल
तालुकानिहाय अहवाल
नांदेड मनपा क्षेत्र-19, अर्धापुर-5,बिलोली-1, धर्माबाद-1, कंधार-3, माहूर-3, नायगाव-1, लोहा-7, हिंगोली-4, नांदेड ग्रामीण-4, भोकर-1, देगलूर-3, हदगाव-7, किनवट-6, मुखेड-13, उमरी-1 व परभणी-1 असे 80 जणांचा समावेश आहे.
——–
अंटीजन चाचणीचा अहवाल
नांदेड मनपा क्षेत्र-38, अर्धापुर-8,बिलोली-1, धर्माबाद-2, कंधार-6, माहूर-3, नायगाव-21, लोहा-3, हिंगोली-1, नांदेड ग्रामीण-6, भोकर-5, देगलूर-6, हदगाव-1, किनवट-6, मुखेड-3, हिंगोली-1, मुदखेड-5 असे 102 जण आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…