नांदेड

पंचवीस स्कोअर असताना कोरोनावर मात करणाऱ्या वृद्धाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आवर्जून भेट

नांदेड,बातमी24:-आजकाल कोरोनाचा सात पेक्षा कमी स्कोर असला,तरी रुग्ण व त्यांचे नातेवाईक घाबरून जातात.मात्र 65 वय वर्षे आलेल्या एका वृद्ध इसमाने 25 स्कोर असताना कोरोनाच्या संसर्गावर मात करत सुखद धक्का दिला.या वृद्ध इसमाचा भेटी घेण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व काही अधिकाऱ्यांच्या टीमने रुग्णलय गाठले. येथे जाऊन त्या आजोबाचे पुष्प गुच्छ देऊन डॉ.इटनकर यांनी नव्या आयुष्यासाठी भरघोस शुभेच्छा देत आजोबाचे स्वागत केले.

लोहा तालुक्यातील जोमेगाव या गावातील सुमारे 65 वर्षाचे कोंडजी शिंदे यांना कोरोनाची लागण झाली होती.
तपासण्या झाल्या. सिटीस्कॅनचा स्कोअर थेट पंचवीसवर निघाला.जवळच्या नातलगांनी त्यांना उचलून नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील कोविड रुग्णालयात दाखल केले. वय आणि सिटीस्कॅनचा स्कोअर हे सारेच अधिक असल्याने उपचार करणारे डॉक्टर सुरवातीला चिंतेत होते.उपचारास शिंदे यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

कोविड रुग्णालयातील त्यांच्या आजूबाजूचे सारे रुग्ण बाबांचा स्कोअर ऐकून जीथे धास्तीत होते, या बाबांनी कोरोनाच्या आजाराला तोंड दिले.यातून त्यांचा ऑक्सिजन लेव्हल काढली.प्रकृतीत सुधारणा होत गेल्याने डॉक्टरांनी ऑक्सिजन काढला.योग्य उपचार व स्वतःला मधील आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी कोरोनावर दणदणीत मात केली.

डॉक्टरांनी त्यांना बळजबरी दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवून सर्व खातरजमा झाल्यानंतर आज ‍रुग्णालयातून सूट्टी देण्याचा निर्णय घेतला. आजवरच्या कोविड उपचारात जिल्हा रुग्णालयातील ही सर्वोच्य सिटीस्कॅनची स्कोअर असलेली केस यशस्वी झाल्याने इतर रुग्णांचे आणि वैद्यकीय टिमचे मनोबल वाढावे, त्यांच्या अथक प्रयत्नांना शाबासकी द्यावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांची भेट घेवून त्यांना रुग्णालयातून शुभेच्छासह निरोप दिला. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालक अधिकारी तथा विभागीय उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago