नांदेड, बातमी:- नांदेड जिल्ह्यातील प्रतिष्ठित असलेल्या ग्यानमाता विद्या विहार या इंग्रजी माध्यम शाळेने मालमत्ता वसुलीची रक्कम न भरल्यामुळे चप्राचार्य दालनास मनपा प्रशासनाने आहे ताळे ठोकले.ही कारवाई मूल्यनिर्धारक व संकलन अधिकारी अजितपाल संधू यांच्या पथकाने केली. या कारवाईने मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 01 येथील तरोडा सांगवी अंतर्गत म्हाळजा येथील ग्यानमाता विद्या विहार येथील शाळेकडे नांदेड वाघाला महापालिकेची तब्बल 18 लाख 53 हजार 931 रुपयांची मालमत्ता कर वसुली शिल्लक आहे,या संदर्भात मनपाकडून वारंवार नोटीस देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मनपा प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले.
यावेळी मनपा प्रशासनाने प्राचार्य दालन सीलबंद केले.ही कारवाई मनपा आयुक्त सुनील लहाने,अतिरिक्त आयुक्त बाळासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली मूल्यनिर्धारण व संकलन अधिकारी अजितपाल संधू,सहाय्यक आयुक्त संजय जाधव,वसुली पर्यवेक्षक संतोष जिंतूरकर,साहेबराव ढगे,वसुली लिपिक सचिन गजभारे,कृष्णा पाथरकर यांच्या पथकाने केली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…