नांदेड, बातमी24:-तीन दिवसांपूर्वी मरण पावलेल्या मयतावर उपचार करण्याचे नाटक म्हणजे पैसे उकळण्याचा प्रकार होता, या प्रकरणी मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशाने गोदावरी रुग्णालयावर गुन्हा नोंद झाला.या प्रकरणी आय एम ए ही संघटना धावून आली खरी, मात्र खुलासा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार समोर आला.त्यामुळे संघटनेच्या नैतिकतेवरच या निमीत्ताने प्रश्नचिन्ह लागत आहेत.
कोरोनाचा संसर्ग झाल्याने मागच्या महिन्यात दि.16 रोजी अंकलेश पवार या शिक्षकास गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र या रुग्णाचा मृत्यू 21 एप्रिल रोजी झाल्याचे मृत्यू प्रमाणपत्र त्याच्या कुटूंबियांना दि.24 रोजी देण्यात आले. मात्र मृत्यू झाल्याचे दि.2४ रोजी दुपारी बारा वाजता कळविण्यात आले, तेही मयताची पत्नी शुभांगी पवार यांच्याकडून त्याच दिवशी 90 हजार रुपये भरून घेतल्यानंतर कळविण्यात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.या बाबत रुग्णलयाने फसवणूक तर केलीच शिवाय प्रेताची विटंबना सुद्धा केल्याचे मयताची पत्नी शुभांगी पवार यांनी कोर्टात दाखल केलेल्या पत्रात म्हटले.
गोदावरी रुग्णालयावर या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद काल करण्यात आला. या रुग्णालयाकडून ही चूक नव्हती तर ती अक्षम्य चूक म्हणावी लागेल. याबाबत दिलेल्या खुलाशात म्हटले,की मयताच्या नातेवाईकांनी गोधळ घातल्याने डॉक्टरांनी दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्रावर 23 ऐवजी 21 असा उल्लेख झाला.ही चूक होण्यास नातेवाईकांनी घातलेला गोंधळ कारणीभूत असल्याचा आरोप संघटनेने केला. नातेवाईकांनी का गोंधळ घातला याबाबत संघटनेने खुलासा केला नाही.नातेवाईक इतका गोधळ घालत होते,याचा इतर रुग्णांना त्रास होतोय या काळजीपोटी पोलिसांना का कळविले नाही,हे मग रूग्णालय व्यवस्थापनाने नातेवाईक यांचा त्रास मुकाट्याने का सहन केला. या बाबत संघटना खुलासा करताना अर्धवट हा माहितीवर का समाधान मानते हे संघटनेने स्पष्ट करायला हवे होते.
संघटना म्हणते अंकलेश पवार यांचा मृत्यू दि.23 रोजी अकरा वाजता झाल्याचे खुलाशात सांगते,तर मयताची पत्नी शुभांगी पवार यांच्याकडून प्रत्यक्षात हा दि.24 रोजी सकाळी दहा वाजता नव्वद हजार रुपये भरून घेतल्यानंतर दुपारी बारा वाजता मृत्यू झाल्याचे सांगण्यात आल्याचे शुभांगी पवार यांचे म्हणणे आहे.
संघटनेच्या वतीने खुलासा करताना या चुकीचे भांडवल करून नुकसान भरपाई रक्कम वसूली किंबहुना तशी मागणी केली जात असल्याचे नमूद केले.पण ही मागणी कोण करतय हे मात्र संघटनेकडून सांगण्यात आले नाही.एका प्रकारे गोदावरीच्या मदतीला संघटना धावून आली,मात्र चुकीवर पांघरून घालण्याचा संघटनेचा प्रकार लज्जास्पद असल्याचे समोर येतंय
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…