नांदेड, बातमी24:– प्रती शुक्रवारी व सोमवारी बाजारात, दुकानात नागरिकांची होणारी गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या उशिरा का होईना लक्षात आले आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक शनिवारी सुद्धा सकाळी नऊ ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील दुकाने, आस्थापने ही अटी व शर्तींच्या अधिन राहून चालू ठेवता येणार आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले.
नांदेड जिल्ह्यात शनिवार व रविवारी दुकाने, आस्थापना बंद असल्यामुळे दर शुक्रवारी व सोमवारी बाजारात, दुकानात नागरिकांची गर्दी वाढत होती. उपाययोजनेचा एक भाग म्हणून सदर गर्दी कमी होण्यासाठी नांदेड जिल्ह्यात प्रत्येक शनिवारी दुकाने, आस्थापना सुरु राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…