जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- केंद्रीय लोकसेवा सेवा आयोगाचा अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.24 रोजी जाहीर झाला आहे.यामध्ये नांदेडमधील एका सामान्य कुटूंबातील सुमितकुमार धोत्रे याने पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. विशेष म्हणजे सुमितकुमार याने वयाच्या 26 व्या वर्षी इतके मोठे यश संपादन केले.सुमितकुमार याचे वडील हे पत्रकार तर आई दिव्यांग असून त्या शिक्षिका आहेत.
नांदेड शहरातील विजय नगर भागात राहणारे दत्ताहरी धोत्रे हे पत्रकारिता करतात.त्यांच्या पत्नी सुर्यकांता दत्ताहरी धोत्रे या खासगी शाळेवर प्राथमिक शिक्षिका आहेत. सुमीतकुमार धोत्रे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण टायनी इंग्लिश स्कुल येथून झाले.सुमित कुमार यास दहावीला 100 पैकी 100 टक्के मिळाले होते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून तो राज्यात पहिला आला होता.याबद्दल त्यास बद्दल सुमीत कुमार यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल मिरिट अवार्ड केंद्र सरकारकडून मिळाला होता. त्याचे बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण केंद्र सरकारच्या योजनेतून झाले.बारावीनंतर झालेल्या जेईई मेन्स परीक्षेत ही टॉपर झाला होता.
बारावीनंतर त्याने खडकपूर येथून बीटेक ही डिग्री इलेक्टरीशीयन या विषयात पूर्ण केली.त्यानंतर कॅम्पस मुलाखतीमधून तो एका बड्या कंपनीत नोकरीला लागला.मात्र दोन महिने नोकरी केल्यानंतर त्याने राजीनामा देत यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला.
सुमितकुमार धोत्रे याने पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस,इंडियन पोलीस सर्व्हिस व इंडियन अडमिस्ट्रीटिव्ह सर्व्हिस या तिन्ही प्रकारच्या परीक्षेच्या मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला. यात त्याने आयएएसकडे जाण्याचा निर्णय घेतला.या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात मोठे संपादन केले.
या यशाबद्दल बोलताना सुमितकुमार याचे वडील पत्रकार दत्ताहरी धोत्रे म्हणाले,की माझ्या मुलाच्या यशात आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या मोठा असून दीपक कदम यांनी सुमितकुमार यांची संपूर्ण तयारी करून घेतली. सुमिकुमार याने आमच्या कुटूंबाचे नाव रोशन केल्याचे पिता दत्ताहरी धोत्रे यांनी सांगितले.
मुलाचे यश ऐकून सुमितकुमार यांची आई सुर्यकांता धोत्रे यांना आनंदाश्रू आले. माझ्या मुलाचे कष्ट कमी आले. माझा मुलगा या सेवेच्या माध्यमातून देशाचे नाव रोशन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
——
दहावीपर्यंत 107 परीक्षेत यशस्वी
मुळात पहिल्यापासून अभ्यासात हुशार असलेल्या सुमितकुमार याने दहावीपर्यत वेगवेगळ्या 107 स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले. सुमितकुमार यांच्या नावे शेकडो पारितोषिक व प्रशस्तीपत्र घराची शोभा वाढवित होते. आयएएस परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सुमितकुमार याचे व त्याचे आई-वडील यांचे फोनवरून अभिनंदन केले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…