नांदेड, बातमी24ः- सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी नवोदयच्या धरतीवर सुरु करण्यात आलेल्या निवासी शाळेच्या माध्यमातून निकालाची उज्जव परंपरा देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. यंदाही निवासी शाळांचा दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल आला आहे, अशी माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागाच्या चार निवासी शाळा नांदेड जिल्ह्यातील हदगाव, माहूर,उमरी व नायगाव येथे आहेत. यात हदगाव येथील अनुसूचित जाती मुलींच्या शाळेतील 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये पुजा मोहन घुंगरराव हिने 91.80, आश्विनी संतोष मुरमुरे हिने 91.20, मिनाक्षी शंकर कदम हिने 90. 60 टक्के गुण मिळविले. माहूर येथील मुलींच्या शाळेतील 38 मुलींनी यश मिळविले.पुजा सुधाकर मारेराव हिने 82.80, पुजा विजय डाकोरे हिने 82.40 टक्के, निकिता अविनाश सावते हिने 82.20 टक्के घेतले.
उमरी येथील मुलांच्या शाळेतील 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात दत्ता प्रसाद पवार याने 88.40, गंगाधर तुपसाखरे याने 85.80, राहुल बुद्धेवाड याने 77.80 तर नायगाव येथील शाळेतील 34 मुले उत्तीर्ण झाले. यात सुशीलकुमार गजभारे याने 93 टक्के, बुद्धभूषण मारोती कांबळे याने 89. 20 तर सुरेश संदीप सोनटक्के याने 87.60 टक्के असे गुण मिळविले.
——
या यशाचे श्रेय अभ्यास करणारे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर अथक मेहनत घेणारे मुख्याध्यापक व शिक्षकांना जाते
तेजस माळवदकरः समाजकल्याण सहाय्यक आयुक्त
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…