नांदेड

जिल्हाधिकारी कार्यालयात भाजीपाला बाजार भरला

नांदेड,बातमी24:- भाजीपाला आठवडी बाजारात, नेहमी भरणार्‍या ठिकाणी किंवा गल्लीबोळात विक्री येत असतो. मात्र सोमवारी जिलहाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या महामागरीत कर्टुले, कुंजरनाय, सुरणघोळ, शेवगा तरोडा, केणा, सुरकंद, चुच या रानभाज्या एकाच जागेवर सहज उपलब्ध झाल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उठली. रानभाज्या महोत्सवाचे आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित केले होते.

राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या संकल्पनेतून आदिवासी दिनाचे औचित्य साधत या एकदिवसीय महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के, बाळासाहेब कदम, आरती सुखदेव, पोखरणी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.देविकांत देशमुख आदि उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात नैसर्गिकरित्या येणार्‍या विविध रानभाज्या अधिक प्रमाणात आहेत. या रानभाज्या ग्राहकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. महिन्यातील निवडक दिवसांसाठी सेंद्रिय, नैसर्गिक भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांसाठी एखादे विक्री केंद्र कसे सुरु करता येईल, याचाही आम्ही विचार करु असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

या महोत्सवात 40 पेक्षा अधिक प्रकारच्या फळ व रानभाज्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आणलेल्या होत्या. दोन तासात सुमारे दोनशे ग्राहकांनी भेट दिली.
विविध तालुक्यातील शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले होते. यात गंगाधर मारोतराव हनमानगे, जनार्दन विठ्ठल पाटील, प्रकाश कद, बंडू परसराम जाधव, विठ्ठल नारायण लष्करे, दत्ता दिगंबर खानसोळे, अंबिका महिला बचत गटाच्या संचालिका अनिता गणेश पाटील, वसुधा गोल्ड गांडूळ खत प्रकल्प बळवंतराव पोळ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago