नांदेड

पुलाखाली पाणी साचल्याने गाडी गेली पाण्यात

नांदेड, बातमी24ः- नांदेड तालुक्याती सर्व मंडळात रात्रीतून अतिवृष्टी झाली,असून तालुक्यात 77 मिलीमिटरपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला आहे. या पावसामुळे हिंगोली गेट खालील रेल्वेपुलाखाली पाणी पातळी वाढल्याने एका चारचाकी वाहन पाण्याखाली गेले आहे. प्रत्येक पावसाळ्यात या पुलाखाली पाणी साचत राहते. महापालिकेकडून कधीच या पुलाच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचा आरोप नगरसेवक बापूराव गजभारे यांनी केला आहे.

प्रत्येक वर्षी हिंगोली गेटच्या पुलाखाली मोठया प्रमाणावर पाणी साचत असते.पाणी वाढले, की या पुलाखालील वाहतुक बंद करावी लागते. पुलाखालील पाण्याचा निचर्‍याबाबत महापालिकेला ठोस असे काम करता आले नाही. थातूर-मातूर काम करून तात्पुरता प्रश्न मिटविण्याचा बाष्कळपणा केला जातो. यामुळे या भागातील नागरिक संतापून जातात.

रात्रीतून झालेल्या पावसामुळे पुलाखाली पाणी साचल्याचा अंदाज बाहेर गावावरून गाडी घेऊन जाणार्‍या चालकास आला नाही. गाडी अर्ध्यापेक्षा अधिक पाण्यात गेली. पुढील धोका पाहून वाहनचालकाने गाडीमधील माणसांना बाहेर काढले. अन्यथा मोठा संभवला असता. या पुलाच्या पाण्याचा कायमचा प्रश्न मिटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मागच्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी करत आहे.परंतु मनपा प्रशासनाला जाग येत नसल्याचे बापुराव गजभारे यांनी सांगितले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago