Categories: नांदेड

समाजकल्याण अधिकार्‍याच्या दुरदृष्टीमुळे होणार दिव्यांगाचे कल्याण

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सत्येंद आऊलवार यांनी दिव्यांगाचे कल्याण साधता यावे, यासाठी दिव्यांग मित्र अ‍ॅपची निर्मिती केल्यामुळे जिल्ह्यातील हजारो दिव्यांगाना याचा लाभ होणार आहे. आऊलवार यांच्या दुरदृष्टीमुळे दिव्यांगाना कल्याणकारी योजना मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे.

दिव्यांग बांधवांची जनगणना केली जावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याबाबत शासनाच्या दिव्यांग विभागाकडून अनेक वेळा तशा सूचना व आदेश जिल्हास्तरावर देण्यात आले होते. परंतु याबाबत अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे दिव्यांगाची संख्या नेमकी किती? दिव्यांगाचे प्रकार कोणते हे आकडेवारीच्या दृष्टीने अपूर्ण माहितीच्या आधारे कारभार चालविला जात असत.

या सगळया पार्श्वभूमीवर समाजकल्याण विभागाच्या वतीने मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात तालुकास्तरावर दिव्यांगाचा मेळावा आयोजित केला गेला. यातून दिव्यांगाचे प्रकार व आकडेवारी तालुकानिहाय मिळविता आली.यातून दिव्यांग बांधव त्याच्या दिव्यांग प्रकाराप्रमाणे काय व्यवसाय करू शकतो. यासंबंधी माहितीचा संग्रह करण्यात आला. यासाठी समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार व समाजकल्याण विभागातील कर्मचार्‍यांनी प्रमाणिकपणे घेतले परिश्रम फ ळाला आले.

दिव्यांग बांधवांची होणारी फ रफ ट थांबली पाहिजे, शाररिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करत जिल्हा परिषदला येण्याचा त्यांचा व्याप कमी व्हावा, यासाठी दिव्यांग मित्र अ‍ॅप बनवित आला आहे. या अ‍ॅपव्दारे दिव्यांग बांधवांना योजनेच्या लाभासंबंधी अर्ज सादर करता येणार आहे. दिव्यांग योजनांची माहिती, नवे शासन निर्णय अशी माहिती मिळणार आहे.या अ‍ॅपचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आले. दिव्यांगाना हे अ‍ॅप मोलाचे ठरेल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
—–
चौकट
दिव्यांग मित्र अ‍ॅप हे दिव्यांग बांधवांची होणारी फ सवणुक थांबविणार आहे. तसेच विविध योजनेचे अर्ज ही या अ‍ॅपव्दारे ऑनलाईन भरता येणार आहे. हे अ‍ॅप बनविण्यासाठी जिल्हापरिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, सीईओ डॉ. शरद कुलकर्णी तसेच समाजकल्याण सभापती अ‍ॅड. रामराव नाईक यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले, असे सत्येंद्र आऊलवार यांनी सांगितले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago