Categories: नांदेड

तीस गुन्ह्यातील आरोपीस पाठलाग करून जेरबंद

नांदेड, बातमी24ः- चार-पाच नव्हे तर तब्बल 29 गुन्यातील कुख्यात आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास जेरबंद केले. या आरोपीस पुढील तपासासाठी तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चोरी व दरोडयाच्या प्रकरणातील गुन्हयाचा तपास करत असताना दि. 15 जून रोजी तेलंगणा व नांदेड जिल्ह्यातील पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद असलेला आरोपी  अर्धापुर तालुक्यातील नांदुसा येथील लक्ष्मण पिराजी मेक्कर हा चौफ ाळा भागातील एका लग्न समारंभासाठी आला असल्याची माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. मात्र आरोपी लक्ष्मण मेक्कर याने तेथून गोदावरी नदीच्या काठाने पळ काढला.

पोलिसांनी नवाघाट पुलाच्या रोडने मुजामपेठ भागात पोलिसांनी त्यास अटक केली. या आरोपीवर लिंबगाव व भाग्य नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पंधरा तर तेलंगणा राज्यातील विविध पोलिस ठाण्यात  14 गुन्हे नोंद आहेत. मधल्या काळात तो जामिनावर सुटला होता. तेव्हापासून फ रार होता. स्थानिक गुन्हे शाखेने पुढील तपासासाठी तेलंगणा पोलिसांच्य त्यास स्वाधीन केले. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडरंग भारती, जशवंतसिंग शाहू, अब्दुल रब, मारोती तेलंग, सखाराम नवघरे, रुपेश दारसवाड, मोतीराम पवार, गणेश धुमाळ यांच्या पथकाने केली.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago