मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांची बदली; तृप्ती सांडभोर नव्या आयुक्त

नांदेड

नांदेड,बातमी24:-नांदेड-वाघाला महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने यांची बदली शासनाकडून करण्यात आली असून यांच्या जागी नव्या आयुक्त म्हणून तृप्ती सांडभोर या असणार आहेत.

राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर अधिकाऱ्यांचे बदल्यांचे चक्र गतिमान झाले असून भाजप व शिंदे सेना गटाकडून आपल्या-आपल्या सोयीच्या अधिकाऱ्यांना स्व-जिल्ह्यात आणण्याचे काम सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. दहा दिवसांपूर्वी नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या बदली झाली. मागील दहा दिवसांत शासनाला नांदेड जिल्हाधिकारी पदाला पात्र अधिकारी सापडू शकला नसल्याबद्दल नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आज सायंकाळी जिल्हाधिकारी म्हणून आदेश निघणार अशीच रोजच चर्चा सुरू असताना इकडे मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या बदलीच्या आदेशाने सर्वांना धक्का बसला आहे.

पनवेल महापालिका येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या तृप्ती सांडभोर यांचे नांदेड वाघाला मनपा आयुक्त म्हणून शासनाने आदेश मंगळवार दि.30 रोजी सायंकाळी उशिरा काढले,तर डॉ. सुनील लहाने हे परभणी आयुक्त म्हणून बदलीने जाणार आहेत.