नांदेड, बातमी24ः- मागच्या आठवडयात बिलोली येथील एक पत्रकार कोरोना पॉझिटीव्ह आला होता.त्यानंतर नांदेड येथील उदय भविष्य पत्राचा या आघाडीच्या दैनिकातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याची चर्चा आहे. मात्र त्यासंबंधी रिपोर्ट अद्याप मिळाला नसल्याचे त्यातील संशयित रुग्णाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या संसर्ग वाढत चालला असून रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवार दि. 14 जुलै रोजी 44 रुग्ण पॉझिटीव्ह तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एका दैनिकातील दोघांची प्रकृती अस्वस्थत वाटत असल्याने त्या दोघांनी तपासणी केली होती. यातील एकास श्री. गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय तर एकास पंजाब भवन येथे दाखल केले आहे. अद्याप आमचा रिपोर्ट आला नाही. मात्र आम्हाला प्रशासनाने रुग्णालयात भरती करून घेतल्याचे पत्रकाराने रुग्णालयातून सांगितले. माझी प्रकृती उत्तम आहे. मात्र दोन दिवसांपासून अंगात कणकण व सर्दी जाणवत होती. त्यामुळे तपासणी करून घेतल्याचे त्या पत्रकाराने सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…