नांदेड

कंधार येथे ब्रेक फेल झालेला टेम्पो हॉटेलात घुसला दोन ठार तर १६ जखमी

नांदेड,बातमी24:-लोहा येथुन हणेगावकडे जाणाऱ्या आयचर टेम्पो (क्रमांक एम. एच.१३ आर.२२२४) टेम्पोचे कंधारच्या बस स्थानकाजवळ अचानक ब्रेक फेल झाला.या अपघातात पती- पत्नी जागीच ठार झाले,तर १६ जण जखमी झाले आहेत. यातील गंभीर सात जणांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

सोमवारी दि.१६ बाजाराचा दिवस होता. यामुळे शहरात मोठी गर्दी होती. सायंकाळी पाचच्या सुमारास लोहयाहून कंधार मार्गे हानेगावला आयचरचे कंधारच्या बस स्थानकाजवळ ब्रेक फेल झाले. चालकाने आरडाओरड करून तशीच गाडी महाराणा प्रताप चौकापर्यंत आणली. आठवडी बाजार असल्याने शहरात गर्दी होती. गाडी थेट हात गाड्याना ठोकरून पुढे जाऊन थांबली. यावेळी आठवडी बाजाराला आलेले गोविंद सटवाजी भंगरे (वय ६५ वर्ष) व मथुराबाई गोविंद भंगरे (वय ६० वर्ष) दोघेही राहणार बाभूळगाव (ता.कंधार) हे पती-पत्नी जागीच ठार झाले. तर १६ जण जखमी झाले.
जखमी मध्ये रामेश्वर भंगरे, शेख जावेद, शेख जाकेर, शेख रौफ, लक्ष्मीबाई वाघमारे, शेख महमूद, रामदेव जाधव, बालाजी मुंडे, अविनाश जायभाये, सत्तार खान, तन्वीर हुसेन, शेख सद्दाम, हसन भंगरे, शंकर भागवत, शेख गौस यांचा समावेश असून त्यातील सात गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago