नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात वेगवेगळया कारणांवरून दोन खुनाच्या घडल्या आहेत. एक घटना भोकर तालुक्यातील भोसी शिवारात उघडकीस आली, तर एक घटना उमरी तालुक्यात घडली आहे.
भोकर तालुक्यातील भोसी येथील युवक विनय प्रभाकरराव कल्याणकर यांच्या संदर्भाने दि. 3 जुलै रोजी मिसिंगची तक्रार कुटुंबियांनी दिली होती. या युवकाचे प्रेत भोसी शिवारात मंगळवार दि. 7 जुलै रोजी सकाळी सापडले, या घटनेची माहिती होताच भोकर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते.या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता.
दुसर्या खुनाची घटना उमरी तालुक्यातील बोलाळ येथिल शेत शिवारात उघडकीस आली. मारोती गंगाधर गाडेकर (वय.24) असे मयताचे नाव असून गळा आवळून खून केल्याची बाबसमोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या प्रकरणी अन्याथ मारेकर्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…