नांदेड

जल जीवन मिशन अंतर्गत एकाच दिवशी 75 किलोमिटर पाईप लाईन;पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड, विशेष प्रतिनिधी:- आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्‍त नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्‍या वतीने एका दिवसात नांदेड जिल्ह्यातील 15 गावांमधून जल जीवन मिशन अंतर्गत 75 किलोमीटर पाईप लेयींग करण्‍याच्‍या विषेश मोहिमेचा शुभारंभ राज्‍याचे सार्वजिक बांधकाम मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्‍हाण यांच्‍याहस्‍ते आज शनिवार दिनांक 26 मार्च रोजी करण्‍यात आला.

यावेळी खासदार, आमदार, सरपंच व ग्रामस्‍थांना पालकमंत्री अशोकराव चव्‍हाण यांनी अभासीपध्‍दतीने संवाद साधला. केंद्र व राज्‍य शासनाची जल जीवन मशीन ही महत्वकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागात घर तेथे नळ जोडी देवून नळाव्‍दारे प्रतिव्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. ही मोहिम गतिमान करण्‍यासाठी जिल्हा परिषदेची ग्रामीण पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. येत्या 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्‍यमंत्री संजय बनसोडे, प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जल जीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी जिल्‍हयात करण्‍यात येत आहे. यातंर्गत आज एकाच दिवशी 75 किलोमीटर पाईपलाईन टाकण्‍याच्या उपक्रम हाती घेण्‍यात आला आहे.
यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्‍हाण म्‍हणाले, जिल्ह्यातील 1310 ग्रामपंचायत अंतर्गत 1205 ठिकाणी एक हजार कोटींची पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार आहे. गावपातळीवर सर्व यंत्रणांनी ही कामे दर्जात्मक करावी. मिशन मोडमध्ये ही कामे पूर्ण होणे आवश्यक आहे, तरच ग्रामीण भागातील नागरीकांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी मिळेल. जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ जोडण्याची धडक मोहीम जिल्ह्यात सुरू झालेली असून ही कामे निर्धारित वेळेत व दर्जात्मक करावीत असे आवाहन पालकमंत्री अशोकराव चव्‍हाण यांनी केले.

जिल्ह्यात नुकताच जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. याअंतर्गत भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्याचा दृष्‍टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे व प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे ही काळाची गरज असून या उपक्रमासाठी जिल्हा परिषद विविध उपक्रम लोकसहभागातून राबविणार आहे. यावेळी जिल्‍हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago