नांदेड

ओमिक्रॉनच्‍या पार्श्‍वभूमीवर सार्वत्रिक कार्यक्रम पन्नासच्या आत;जिल्‍ह्यात पुन्हा निर्बंध लागू

नांदेड,बातमी24:- ओमिक्रॉन, कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्याचा वाढलेला धोका आणि कोविड-19 चा प्रसार रोखणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये  31 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून  कडक निर्बंध लागू होतील. या आदेशानुसार नांदेड जिल्‍ह्यात पुढील निर्बंध जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लागू केले आहेत.

विवाह समारंभाच्या बाबतीत समारंभ बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेवर असो त्‍याठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्ती पुरती मर्यादित असेल. बंदिस्त जागेत किंवा मोकळ्या जागेवर, कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम, मग तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, त्‍याठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.
अंत्‍यसंस्कारांच्या बाबतीत जास्तीतजास्त उपस्थितांची संख्या 20 लोकांपर्यंत मर्यादित असेल. राज्य / जिल्‍ह्याच्‍या कोणत्याही गर्दीच्‍या ठिकाणी, पर्यटन स्थळे किंवा समुद्रकिनारे, मोकळी मैदाने इत्‍यादी ठिकाणी, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले आहेत. त्‍यानुसार नांदेड जिल्‍ह्यातील गर्दीच्‍या ठिकाणी आवश्‍यकतेनुसार तसे यथावकाश आदेश निर्गमित करण्‍यात येतील. तसेच याअधी अस्तित्‍वात असलेल्‍या इतर सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860 मधील व संदर्भ 1 व 2 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. निर्गमीत आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका / नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच जिल्‍ह्यातील सर्व संबंधीत कार्यालय प्रमुखांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहील.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

2 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

2 months ago