Categories: नांदेड

वाडी तांडयांवरील मुले वंचित राहू नये- जि.प. अध्यक्ष सौ. अंबुलगेकर

नांदेड, बातमी24ः– जिल्ह्यातील हजारो कामगार हे रोजंदारीच्या निमित्ताने मोठया शहरात गेली होती. हे मजूर आप-आपल्या गावी परतले आहेत. अशा मजूरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.मंगाराणी अंबुलगेकर यांनी दिली.

जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना सौ. अंबुलगेकर म्हणाल्या,की जिल्ह्यातील अनेक शाळा या पटपडताळणी अभावी बंद पडल्या आहेत. मात्र हजारो पालकांची पाल्य हे गावी आलेली आहेत. अशा मुलांना शाळेत प्रवेश देऊन पटसंख्या वाढविण्यात यावी, जेनेकरून विद्यार्थ्यांची शिक्षणाअभावी होणारी फ रफ ट थांबू शकले, याबाबत शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना तशा सूचना देण्यात आल्या असून सर्व्हे करण्याबाबत कळविण्यात आल्याचे सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले.

शाळांच्या पटसंख्या बाबतचा जसा महत्वाचा विषय होता. तशा शेतकर्‍यांनी लावलेल्या सोयाबीन पिकाचे बियाणे अनेक ठिकाणी उगवण झाली नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना चौकशी करून अहवाल कळविण्यात सांगण्यात आले आहे. दोषी दुकानदार व कंपन्यांची गय केली जाऊ नये, असे कळविण्यात आल्याचे सौ. अंबुलगेकर यांनी नमूद केले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago