नांदेड, बातमी24:-आपल्या सकारात्मक कार्यातून परिवर्तनाची बीजे पेरणाऱ्या नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र परीश्रम घेतले.आता कोरोनाचे संपूर्ण उचाटन करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविली असून सायकलद्वारे जागर केला.यावेळी त्यांनी व त्यांच्या सायकल प्रेमी मित्रांनी नांदेड ते कंधार असा सायकल प्रवास केला.या सायकल रॅलीत डॉ.इटनकर यांच्या पत्नी डॉ.सौ इटनकर या सुद्धा सहभागी झाल्या होत्या.
लसीकरणाचा टक्का वाढला पाहिजे,यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर हे नाविन्यपूर्ण उपक्रम रावबित असतात.त्यांनी एलईडी डिजिटल मोबाईल व्हॅनद्वारे गावोगावी चलचित्राच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन जागृती अभियान राबविले.
त्याचाच एक भाग म्हणून रविवार दि.8 रोजी जिल्हा प्रशासन,परिषद जिल्हा आरोग्य विभाग,जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय तसेच सायकलिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नांदेड ते कंधार अशी सायकल रॅली काढण्यात आली.य सायकल रॅलीत 30 ते 40 जणांनी सहभाग नोंदविला. यावेळी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे हे उपस्थित होते.या रॅलीत डॉ.सौ.इटनकर यांनी सुद्धा सहभाग नोंदविला.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…