नांदेड, बातमी24ः कोरोनाचे संसर्ग थोपविण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा एकमेव दुवा आहे. त्यासाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे ग्रामीण भागात लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत. अगदी छोटया लोकसंख्येच्या गावात जाऊन 45 वर्षांवरील महिला-पुरुषांचे लसीकरण केले जात आहे. यामध्ये आतापर्यंत 2 लाख 27 हजार 433 जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली.
मागच्या काही दिवसांपासून कोरोनाची लाटेने रौद्ररुप धारण केले असून सर्वत्र हाहाकार माजविला आहे. बेड मिळाले, तर इंजेक्शन मिळणे कठिण झाले तर कधी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. भविष्यात कुणालाही कोरोनाचा संसग होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आदेशान्वये, नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील ग्रामीण भागात लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या लसीकरणाच्या कार्यात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व जिल्हा परिषद आरोग्य विभागाची गावपातळीवर काम करणारी शासकीय यंत्रणेकडून पूर्ण क्षमतने लसीकरणाचे काम गावा-गावात केले जात आहे. लसीकरणाचा साठा ज्या प्रमाणे उपलब्ध होईल तसे-तसे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात 45 वर्षे पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या 9 लाख 56 हजार 215 एवढी आहे.यातील आतापर्यंत 24 टक्के म्हणजे 2 लाख 27 हजार 433 लोकांना लस देण्यात आली आहे. आगामी काळात एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…