नांदेड

जागतिक शौचालय दिनानिमित्‍त विविध उपक्रम:- सीईओ वर्षा ठाकूर यांची माहिती

 

नांदेड,बातमी24:- 19 नोव्‍हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. त्‍यानिमित्‍त राज्‍य शासनाच्‍या वतीने हागणदारीमुक्‍त झालेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये स्‍वच्‍छतेचे विविध उपक्रम राबविण्‍याच्‍या सूचना दिलेल्‍या आहेत. त्‍यानुसार उद्या शुक्रवारी जिल्‍हयातील सर्व गावातून स्‍वच्‍छता विषयक विविध उपक्रम राबविण्‍यात येणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन जागतिक शौचालय दिवस साजरा करावा, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता या अनुषंगाने राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 ची सुरुवात झालेली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्‍हयात विशेष मोहिम हाती घेण्‍यात आली आहे. यात सार्वजनिक शौचालय, शाळा व अंगणवाडी शौचालय तसेच ग्राम पंचायत कार्यालय शौचालयाची स्‍वच्‍छता करणे तसेच सार्वजनिक शौचालयामध्‍ये पाण्‍याची सुविधा व वीज जोडणी उपलब्‍ध करुन देणे तसेच सार्वजनिक शौचालय, शाळा व अंगणवाडी शौचालय व ग्राम पंचायत कार्यालय शौचालय नादुरुस्‍त असल्‍यास त्‍यांची दुरुस्‍ती करणे आदी उपक्रम रा‍बविण्‍यात येणार आहेत. तरी गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी यांनी गाव निहाय नियोजन करुन उपक्रमाचे आयोजन करावे. या उपक्रमात सर्व नागरीकांनी सहभाग घेवून ही मोहिम यशस्‍वी करावे, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago