जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24:-लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली,असून अनेक जण आपले नशीब आजमावू पाहत आहेत. यात नांदेड महापालिक माजी सभापती संगीत विठ्ठल पाटील डक यांनी मैदानात उडी घेतली आहे.यात डक दांपत्यानी जोरदार शक्कल लढवित आषाढी एकादशीच्या निमित्ताने चाळीस हजार विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती मतदारांच्या घरी पोहचवून मतदारांना धार्मिक व भावनिक साद घातली आहे.या त्याच्या स्तुत्य उपक्रमाची नांदेड उत्तर विधासभा मतदारसंघात चांगलीच चर्चा असून या निमित्ताने डक दांपत्याची दावेदार अधिक मजबूत मानली जात आहे.संगीता डक यांना विजय करण्यासाठी विठ्ठल-रुकमाई धावून आल्याची भावना मतदारसंघात निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांचा अचानक झालेला भाजप प्रवेश व त्यासोबत अनेक जण भाजपमध्ये दाखल झाले, यात बाजार समिती माजी संचालक विठ्ठल पाटील डक यांचा ही समावेश होता.मात्र भाजपचा झालेला पराभव व लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत.यात नांदेड उत्तरमधून काँग्रेसला।मिळालेली मतांची आघाडी शिंदे गट शिवसेनासह भाजपलाही धडकी भरविणारी आहे. या मतदारसंघात राजकीय वातावरण अस्थिर बनले असून शिंदे गट शिवसेनेला धक्का लागण्याची शक्यता तूर्त तरी तसे चित्र दिसत आहे. यात मतदारसंघात आजघडीला प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास संधी अधिक असल्याचे मानले जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर नांदेड उत्तर विधानसभा विठ्ठल पाटील डक व संगीता पाटील डक या दाम्पत्यानी आखा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला असून,एका-एका गावात तीन ते चार वेळा भेटीगाठी झाल्यात आहेत, प्रत्येक गावात चांगला प्रतिसाद ही मतदारांकडून मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत खा. वसंत चव्हाण यांना सगेसोयरे यांचा लाभ मिळाला तसाच संगीता पाटील डक यांचे सगेसोयरे हे गावागावात असल्याने त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे.
या मतदारसंघात विठ्ठल पाटील डक व संगीता पाटील डक हे पायाला भिंगरी बांधून दौरे करत आहेत.सोबत सामाजिक उपक्रम ही मतदारांच्या पसंतीला उतरत असल्याने या दाम्पत्यांची लोकप्रियता मतदारसंघात वाढली असल्याचे बोलले जात आहे.मधल्या काळात दहा हजार लोकांसाठी आयोजित केलेली रसाळी,त्यानंतर दुधविक्रेते यासाठी तीन हजार रेनकोट,विद्यार्थी गुणगौरव सोहळा,आणि आता चाळीस हजार विठ्ठल-रुकमाई मूर्ती घरोघरी भेट देऊन ऊत्तर विधानसभा मतदारसंघात जोरदार मुसंडी घेतली असून प्रतिस्पर्ध असलेल्यांना धडकी भरविणारी मानली जात आहे.कोणत्या पक्षाकडून लढायचे याबाबत अजूनही अस्पष्टता असली,तरी डक दांपत्यानी विजयासाठी आवश्यक असणारी दावेदार मजबूत केली असून काँग्रेस किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट याकडून उमेदवारी मिळावी,यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांच्या कडून स्पष्ट वाच्यता अद्याप केली जात नाही. कदाचित अपक्ष उभे राहिले,तरी या मतदारसंघाच्या महिला उमेदवार म्हणून सुरू असलेली1 घोडदौड आजघडीला कुणी थांबवू शकत नाही,हे नक्की
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…