Categories: नांदेड

खासदारपुत्र जेव्हा अधिकार्‍यांवर भडकतात…

नांदेड, बातमी24ः- भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर हे संयमी व सर्वांशी आपुलकी आणि प्रेमाने वागणारे व्यक्तीमत्व आहे. प्रवीण पाटील चिखलीकर यांना राग आल्याचे कधीच दिसून आले नाही. मात्र काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ते एका अधिकार्‍यावर चांगलेच भडकल्याचे पाहून अधिकारी, पदाधिकारी व समिती सदस्यांच्या भवया उंचावल्या.

जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक शुक्रवारी पार पडली.प्रवीण पाटील चिखलीकर हे स्थायी समिती सदस्य आहेत. प्रवीण पाटील चिखलीकर यांनी ग्रामसेवकांच्या अडचणी संदर्भात प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कोंढेकर यांना दिल्या होत्या. मात्र याकडे श्री. कोंढेकर यांनी दुर्लक्ष करत सूचनेला बगल देण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारावरून प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कोंढेकर यांची चांगलीच झाडाझडती घेतली. कधी कामे आम्ही सांगत नाही, प्रशासनास कधीही अडचणीत आणण्याचा उद्देश नसतो. परंतु एखादे काम सांगितल्यास तेही ऐकण्याची तयारी नसेल, तर यापुढे कोंढेकर यांची माझ्याशी गाठ असेल, या शब्दात त्यांनी ठणकावले.

कोंढेकर यांचा समाचार घेत असताना पदाधिकारी व समिती सदस्य गप्प बसून होते. मागच्या सात ते आठ वर्षांच्या काळात प्रवीण पाटील चिखलीकर हे कोणावर ही कधीच भडकल्याचे बघायला मिळाले नाही. मात्र कोंढेकर यांचे कालच्या बैठकीत कपडे उतरविण्याचे काम चिखलीकर यांनी करून आपला कधी नव्हे असा रुद्र आवतार सभागृहाला दाखवून दिला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago