नांदेड

जिल्ह्यातील मराठा नेत्यांवर अन्याय का केला? फारुक अहमद यांचा चव्हाण यांना सवाल

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यातील राजकारणात मूळ नांदेडकर मराठा नेते स्वकर्तृत्व व स्वकष्टाने पुढे आले होते व आपआपल्या पद्धतीने राजकारणात सक्रिय होते. तत्कालीन नेत्यांची सामाजिक बांधिलकी अशोक चव्हाणांपेक्षा चांगली होती. आपआपल्या परीने त्या मराठा कुटुंबियांनी गरीब-श्रीमंत असा भेदभाव निर्माण न होऊ देता राजकारण केले होते.

त्यात शामराव कदम, जयंतराव पाटील वायपनेकर, गंगाधरराव कुंटूरकर, साहेबराव बारडकर, आष्टीकर, खतगावकर, गोरठेकर, तरोडेकर, किन्हाळकर, भाऊराव पाटील धनेगांवकर यांना राजकीय द्वेषातून बाजूला केले आणि मूळ नांदेडशी काहीही संबंध नसलेल्यांना खर्‍या मराठा नेत्यांच्या उरावर बसवले. ही गरीब- श्रीमंत मराठ्यांमध्ये अशोक चव्हाणांनी जाणीवपूर्वक फूट पाडली असल्याचा आरोप फ ारुक अहेमद यांनी केला.

महाराष्ट्रातील सर्वाधीक आत्महत्या झालेल्या जिल्ह्यांमध्ये बीड नंतर नांदेडचा नंबर लागतो यातूनच चार दा मुख्यमंत्रीपद लाभलेले घराण्याचे श्रीमंत राजकुमाराने छोट्या शेतक-यांचकडे पाठ फिरवून आपले कारखाने चालवण्यावर भर दिले या पेक्षा गरीब-श्रीमंत फुटीचे काय वेगळे उदाहरण द्यावे? याचे उत्तर चव्हाण यांनी आधी द्यावे आणि नंतरच बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलावे असे प्रत्युत्तर वंचितचे नेते फारूक अहमद यांनी दिले

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago