नांदेड

देवस्वारी बाबत देवस्थान समितीसोबत चर्चा करणार:-जि. प.अध्यक्ष सौ.अंबुलगेकर

 

नांदेड,बातमी24:- लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.क्षेत्र मालेगाव यात्रा कोरोनाच्या संकटाचा विचार करता,यंदा यात्रा आयोजित न करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे, या पार्श्वभूमीवर देवस्वारी बाबत देवस्थान समिती सोबत प्रशासन चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी दिली.

जिल्हा परिषद स्थायी समिती बैठक बुधवार दि.30 रोजी झाली.कोरोनानंतर प्रथमच स्थायी समिती बैठक एकत्रित म्हणजे ऑफलाईन झाली.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद्मा रेड्डी सतपलवार, सभापती संजय बेळगे, सभापती रामराव नाईक,सभापती सौ.सुशीला बेटमोगरेकर,सीईओ वर्षा ठाकूर, अतिरिक्त सीईओ डॉ.शरद कुलकर्णी,सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर,पूनम पवार यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने माळेगाव यात्रेवर चर्चा झाली. प्रत्येक वर्षी यात्रेत लाखो भाविक येत असतात.कोरोनाच्या संकटाचा विचार करता प्रशासनाने यात्रा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी देवस्वारीने यात्रेचा प्रारंभ होत असतो, या देवस्वारी हजारो भाविक एकत्र येत असतात.देवस्वारी या वर्षी काढावी,की नाही.संभ्रम आहे.त्या अनुषंगाने स्थायी समिती बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सौ.मंगराणी अंबुलगेकर यांनी सांगितले.

देवस्वारी काढू नये, कदाचित देवस्वारी काढली तर हजारो भक्त सहभागी होऊ शकतील. त्यामुळे देवस्वारी काढावी,की नाही.या बाबत देवस्थान समिती व तेथील मानकरी यांच्यासोबत प्रशासन चर्चा करणार आहे.यात प्रशासन देवस्वारी काढू नये,अशी विनंती देवस्थान समितीसोबत चर्चा करेल,असे सांगण्यात आले.
माळेगाव यात्रा येथे जनजागृती बॅनर लावले जाणार आहेत.

याचसोबत सावित्रीबाई फुले पुरस्कार गत व चालू वर्षातील दि.26 जानेवारी रोजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्तेवाटप होणार आहे.जिल्हा परिषदकडून घर घर नळ योजनेची पाहणी जिल्हा परिषस करणार असल्याचे सौ.अंबुलगेकर यांनी दिली.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago