नांदेड, बातमी24ः- तत्कालीन ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया ऑनलाईन करून अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या ऑफ लाईन बदल्या बंद करून बदल्यांची प्रक्रिया मंत्रालयस्तरावरून ऑनलाईन केली होती. परिणामी शिक्षकांच्या बदल्यांमधून होणारी उलाढालीला बे्रक लागला होता.परंतु महाआघाडी सरकारने पुन्हा ऑफ लाईन बदल्या करण्यासंबंधी आदेश दिला आहे. परिणामी जिल्हापरिषदेल शिक्षकांच्या बदल्यांचा मोठा बाजार भरणार आहे. त्यामुळे हात खाजवित बसलेल्या पदाधिकारी, सदस्य व प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचार्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.
शासन 7 जुलैच्या निर्णयप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन ऐवजी ऑफ लाईन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांमधील पदोन्नत मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर व प्राथमिक शिक्षक या संवर्गातील बदली पात्र शिक्षकांच्या सेवाजेष्ठता याद्या व रिक्तपदांच्या अहवाल उद्यापर्यंत सादर करण्याचे सूचना आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या 8 हजार 330 इतकी आहे. एकूण कार्यरत शिक्षकांच्या 15 टक्के बदल्या कराव्या लागणार आहेत.त्यानुसार किमान एक हजार शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. सेवाजेष्ठता व बदलीपात्र ठरलेल्या शिक्षकांच्या अर्जाचा विचार करता बदल्या केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हास्तरावर समुपदेशनाची प्रक्रिया घेतली जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे समुडीत कोबंडी असा प्रकार सर्रासपणे चालणार आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी शिक्षकांच्या बदल्यांना शिस्त लावली होती. समुपदेशनाला बोलावून सेवाजेष्ठतेचा विचार करून तेही इनकॅमेरा बदल्याची प्रक्रिया व विशेष म्हणजे, जाग्यावर बदलीचे आदेश असा बदल्यांचा पॅर्टन राबविला होता. त्यानंतरच्या पूर्ववेळ सीईओ राहिलेल्या अशोक शिनगारे व अगदी अशोक काकडे यांनी बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली होती.
जिल्हा परिषदेला पूर्णवेळ सीईओ नसल्याने शिक्षकांच्या बदल्यांबद्दल आतापासून चर्चेला पेव सुटले आहे.पदाधिकारी, सदस्यांच्या मर्जी राखत अधिकारी सुद्धा नंदीबैलासारखा स्वतःचाही पोळा साजरा करून घेतील असे बोलले जात आहे. शिक्षकांच्या ऑफ ंलाईन बदल्या काहींना हात चालून आलेली संधी असल्याचे वाटत आहे. त्यात अधिक कसा हात धुवून घेता येईल, यावर लक्ष ठेवून आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…