नांदेड, बातमी24:- विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने जिल्ह्यातील विविध आश्रम शाळा व तांडा सुधार योजनांच्या कामाची पाहणी केली आहे.काही ठिकाणी आक्षम्य चुका आणि त्रुटी दिसून आल्या आहेत. त्यामुळे दोषींवर कारवाई केली जाणार असून यासाठी मुंबई मंत्रालय येथे सुनावणी लावली जाईल अशी माहिती विमुक्त जाती व भटक्या कल्याण समिती सदस्य तथा विधान परिषद सदस्य संजय दौड यांनी सांगितले.
दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आलेल्या समितीकडून रविवारी विविध आश्रम शाळा,तांडा विकास योजनेचे रस्ते आदींची पाहणी करण्यात आली. याबाबत समिती अध्यक्ष शांताराम मोरे,संजय दौड व रत्नाकर गुट्टे यांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी निकृष्टपणे करण्यात आलेल्या कामाचे नमुने सोबत घेतली.त्याचसोबत कासारखेडा येथील तांडा रस्ते विकास कामाबद्दल ही समितीने पंचनामा केला. येथील गावकरी मंडळींनी रस्ते कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार समिती सदस्य संजय दौड यांच्याकडे नोंदविली.
वाघाला व पासदगाव येथे असलेल्या आश्रम शाळातील गैरसोयीबद्दल समितीकडून पोलखोल करण्यात आली.यावेळी समितीकडून छायाचित्र व व्हिडिओ शूटिंग करण्यात आली.त्यामुळे आश्रम शाळांवर कारवाई निश्चित होणार असल्याचे संजय दौड यांनी सांगितले.
——
शंकरराव चव्हाण यांची दूरदृष्टी लाभलेला जिल्हा:-दौड
देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्यामुळे पुणे आणि बारामती जिल्ह्याचा विकास झाला तसाच विकास नांदेड जिल्ह्याला स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा वारसा लाभला आहे. यांच्या दूरदृष्टीमुळे नांदेड जिल्ह्याला वैभव प्राप्त झाले.सिंचन क्षेत्राचा मोठा विकास झाला.त्याच पावलावर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विकासाची गंगा नांदेड जिल्ह्यात पोचविल्याचे संजय दौड यांनी आवर्जून सागितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…