नांदेड,बातमी24:-बिलोली येथील गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांना पंचायत समितीचे उपसभापती शंकर यंकम यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवार दि.११ रोजी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांनी कामबंद आंदोलन करत घटनेचा निषेध नोंदवला आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली.
बिलोली येथील गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांना बिलोली पंचायत समितीचे
उपसभापती शंकर यंकम यांनी सभापतीच्या निवासस्थानी बोलवून आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली या प्रकरणी गट विकास अधिकारी नाईक यांच्या तक्रारीवरुन उपसभापती यंकम यांच्याविरुध्द गुन्हादाखल करण्यात आला. परंतु संबंधितास अटक न केल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद संबंधित सर्व कर्मचारी संघटना गुरुवारी एकवटल्या त्यांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्हा परिषदेत आंदोलन केले व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले या निवेदनात यंकम यांचे सदस्यत्व रदद करावे गट विकास अधिकारी यांना पोलिस संरक्षण दयावे अशी मागणी निवेदनात नमुद केली आहे. आरोपीला अटक न केल्यास बेमुदत आंदोलन करण्यात येईल व शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. या बैठकीस श्री. राजेंद्र तुबकले – अत्ती मुख्यकार्यकारी अधिकारी, श्री. बाबुराव पुजारवाड- राज्य कार्याधयक्ष -जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार प्रणित) श्री. सुधीर ठोंबरे – उपमुख्य कार्यकारी अधिकारी,श्री. नामदेवकेंद्रे – उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले,या निवेदनावर गट विकास अधिकारी केशव गडापोड, श्रीकांत बळदे, तुकाराम भालके यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मारहाणीच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रल्हाद थोरवटे, जिल्हा सचिव सिध्दार्थ हत्ती अंबीरे, कार्याध्यक्ष राघवेंद्र मदनुरकर, कोषाध्यक्ष पवन तलवारे,धनंजय गुंमलवर,बालाजी ताट्टीपामले, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक यूनियन चे अध्यक्ष धनंजय वडजे, सचिव हणमंतर वाडेकर, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सांख्यीकी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष जी.एस.पांडलवाड, कार्याध्यक्ष सुधिर सोनवणे सचिव आडेराव डि.के. सहसचिव योगेश वाघ, महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य सांख्यीको संघटना जिल्हाध्यक्ष गणेश कूटरवार, जिल्हासचिव शेख बाबु मोलासाब, मोरे चंपतराव, डोणेराव, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषि तांत्रिक संघटना अध्यक्ष पी.एम. गायकवाड, सरचिटणीस श्रीधर गडगीळे, मुंजाळ येणार, महराष्ट जिल्हा परिषद विस्तार अधिकारी पंचायत संघटना अध्यक्ष प्रदिप सोनटक्के, सचिव जीवन कांबळे, प्रकाश जाधव, उडतेवार यु.डी. तसेच जिल्हा परिषद वाहनचालक संघटना अध्यक्ष गणेश अंबेकर, सचिव किरण वैदय, परिचर संघटनेचे अध्यक्ष गोविंद गज्जेवार, स बिलोली पंचायत समितीतून देशपांडे, लतीफ खान, शेख रब्बानी लिपीक वर्गीय संघटना सदरील संघटनेचे सर्व अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या निषेध मोच्यांचे सुत्रसंचलन आर. डी. मदनुरकर यांनी केले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…