नांदेड,बातमी24:- सलग दोन टर्म त्यात दोन वेळा त्याच खात्याचे सभापती,अलीकडे वरिष्ठांच्या मर्जीतील हुकमी एक्का अशी बांधकाम सभापती संजय बेळगे यांची ओळख निर्माण झाली आहे, त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये लोकांचा ओढा हा बेळगे यांच्या शासकीय कार्यालय किंवा शासकीय बंगल्यावर अधिक असतो. विशेषतः जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अंबुलगेकर यांचे होणारे दुर्लक्ष हे बेळगे यांच्य पत्यावर पडते. यातून बेळगे हे या राजकीय वजनाचा उपयोग हा अधिकारी व कर्मचारी यांच्यावरील पकड निर्मानात पुरेपूर करून घेतात. त्यामुळे आजघडीला संजय बेळगे यांची जिल्हा परिषदेत एकहाती बेळगेशाही बघायला मिळते.
शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे यांना विधान परिषद आमदार अमर राजूरकर यांचा मोठा राजकीय वरदास्त आहे. परिणामी बेळगे यांचे कामे कधीच रेंगाळत पडत नाही, वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी सुद्धा बेळगे यांच्या कायम ऐकण्यात असतात.तसेच जिल्हा परिषद सदस्य यांना निधीच्या विषयात हात मोकळा सोडण्याची भूमिका असल्याने बऱ्यापैकी सदस्य हे बेळगे यांच्या ऐकण्यातील आहेत. सर्वांशी जुळवून घेण्याचे कसब(तंत्र) बेळगे यांच्यासारखे इतरांना न जमल्याने ते कायम प्रकाश झोतात राहतात.
दोन दिवसांपूर्वी देगळूर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार
श्री जितेश अंतापूरकर आणि नांदेड वाघाळा शहराच्या महापौर जयश्री निलेश पावडे यांचा जिल्हा परिषद नांदेड येथे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे यांच्या दालनांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला. हा सत्कार सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने मंगराणी अंबुलगेकर या स्वतः त्यांच्या दरबारात ठेवू शकल्या असत्या,मात्र तितकी तत्परता त्या दर्शवित नाहीत,त्यामुळे अध्यक्ष असूनही त्यांची आवस्थामागच्या बाकावर अशी मिळते.
नवनिर्वाचित आमदार अंतापूरकर आणि महापौरपदी विराजमान झालेल्या जयश्री निलेश पावडे यांना सत्कारासाठी बेळगे यांनी राजकीय शक्कल लढवीत जिल्हा परिषद नांदेड येथे विशेष आमंत्रित केले. याप्रसंगी विधानपरिषदेचे आमदार आणि काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर तसेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन वसंतराव चव्हाण, अध्यक्ष सौ मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर हे उपस्थितीत होते. हा सत्कार सोहळा बेळगे यांचे राजकीय वजन वाढविणारा ठरला.
या कार्यक्रमास मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्रसिंह गाडीवाले, माझी महापौर शमीम अब्दुल्ला, अमित तेहरा, जे. जे.रुग्णालयाचे अधिक्षक गायकवाड, किशोर स्वामी, नगरसेवक देशमुख, संतोष मुळे, अशोक पाटील पाचपिंपळीकर अशी मनपा पदाधिकारी, नगरसेवक तसेच जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व अधिकारी अशी मोठी फौज बघायला मिळाली.यावरून जिल्हा परिषदमध्ये संजय बेळगे यांची बेळगेशाही विशेषतः एकहाती असल्याचे बघायला मिळाली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…