नांदेड

जिल्हा परिषदेचा करोडो रुपयांच्या भूखंड हा श्रीखंड होण्याच्या मार्गावर

 

नांदेड,बातमी24:- नांदेड येथील तरोडा नाका येथे असलेला तीन एकरवरील भूखंडाची जागा आता चारही बाजूने गिळंकृत करण्याचे काम सुरू असून याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष,सीईओसह अन्य अधिकारी व पदाधिकारी डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजरासारखे जणू काही माहीत नाही असे वागत आहेत.

जिल्हा परिषदेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. पंधरा कोटी पर्यंत असणारा पूर्वी सेस पुढील वर्षी पाच ते सात कोटींवर येण्याची शक्यता आहे. शासनाचे आखर्चित असणारे करोडो रुपये परत गेले आहेत.त्यामुळे पुढील काळात जिल्हा परिषदेची हलाखीची होऊ शकते.

अशी बिकट परिस्थिती असताना जिल्हा परिषद प्रशासन व पदाधिकार्याकडून याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. नांदेड शहरात तरोडा नाका,वजीराबाद येथील मल्टिपर्पज शाळा जागा, जिल्हा न्यायालय इमारतीच्या पाठीमागची ही जागा आहे,तसेच महापालिकाशेजारील भव्य इमारत अशी दोनशे कोटी रुपयांचे भूखंड एकट्या जिल्हा परिषदेचे आहेत.

तरोडा नाका येथील भूखंड पश्चिम दिशेने अतिक्रमण करून भव्य तीन मजली व्यापारी गाळे बांधण्यात आले.दक्षिण दिशेने मासविक्री करणारे दुकाने थाटली आहेत.पूर्व दिशेने सुद्धा अतिक्रमण झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून येथील खदानीत मुरूम टाकून तेथे ही अतिक्रमण होण्याची शक्यता आहे.याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा हा करोडो रुपये किमतीचा भूखंड कधी गिळंकृत होईल ते सांगता येत नाही.
——
धनगे यांचा लढा एकांकी
जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी तरोडा नाका येथील भूखंड अतिक्रमण संबंधी लढा दिला;पण त्यांच्या लढ्यास जिल्हा परिषदेची साथ मिळाली नाही.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago