नांदेड

जिल्हा परिषदेची यंत्रणा ग्रामीण भागात अलर्ट;सीईओ ठाकूर यांच्या नदी काठच्या गावांना भेटी

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यात सध्या संततधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज सकाळी आभासी पद्धतीने खाते प्रमुख, जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांची बैठक घेऊन आढावा घेतला.
गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांनी मुख्यालय हजर राहून दर दोन तासाने आपत्ती अहवाल मोबाईलवर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आज सकाळपासून वर्षा ठाकूर यांनी पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या नदी काठच्या गावांना भेटी देऊन मदत कार्य केले.

 

 

 

 

आढावा घेऊन पुराचा वेढा पडला आहे काय? तशी शक्यता आहे काय? कोणी शेतकरी शेतमजूर आगर नागरिक शेतात अडकला आहे काय? गावात सखल भागातील पाणी साचून पाणी घरात शिरले असेल अगर तशी शक्यता असल्यास तेथील कुटुंबांना गावातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. गावातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण दररोज केले पाहिजे, शक्यतो पाणी उकळून थंड करून पिण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात यावे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांना गावातील सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून वेळच्यावेळी माहिती देण्याबाबत कळवावे, आपत्कालीन परिस्थिती उद्भभवली किंवा काही मदत हवी असल्यास तात्काळ प्रशासनाच्या संपर्कात रहावे आणि ग्रुपमध्ये तसा मेसेज टाकावा. तसेच सर्व शेतकरी बांधवांना आपली जनावर हे सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना द्याव्यात जेणेकरून पुरामुळे किंवा पाण्यामुळे जनावरे दगावणार नाहीत याची काळजी घ्यावी.
नदी काठच्या गावात सतर्क राहून पाणी असल्यास सुरक्षित ठिकाणी लोकांना स्थलांतरित करण्यात यावे व प्रशासनाच्या संपर्कात राहावे. गावातील निष्णात पोहणारे, जेसीबी धारक, स्वयंसेवक यांची यादी व मोबाईल नंबर ठेवावे. ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन समिती त्वरित स्थापन करावी अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
*चौकट*
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या प्रमाणे सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, उप अभियंता, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी मुख्यालय राहून सुरू असलेल्या संततधार पाऊस व आपत्कालीन परिस्थितीचा आढावा जिल्हा परिषदेच्या ग्रुपवर दर दोन तासाला देत आहेत. त्यामुळे प्रशासनाला देखील योग्य व वेळेत माहिती मिळाली आहे. सकाळपासून सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक फिल्डवर काम करत असल्याचे पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शाबाशकीची थाप दिली आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago