नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सभा ऑनलाइन घेण्याबाबत शासनाचा आदेश काटेकोरपणे पाळला जातो. मात्र त्याच शासनाच्या मत्र्यांचे पत्रांना केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न दुसर्यांदा झाला आहे.या प्रकरणाची सरकारकडून दखल घेतली जाऊ शकते.
पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बारगळ यांच्याविरोधात जिल्ह्यातील आमदारांसह जिल्हा परिषद सदस्यांची सुद्धा तीव्र नाराजी आहे. यात काही पदाधिकार्यांचा समावेश आहे.परंतु; जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर हे एकमेव बारगळ यांची पाठराखण करत असतात. अध्यक्षांकडे पाणी पुरवठा व लघू पाटबंधारे हे दोन प्रामुख्याने विभाग येतात. मात्र अध्यक्ष हे सर्व विभागाचे प्रमुख असतात.मात्र इतर विभागाकडे त्या फ ारस लक्ष न देता, त्या दोन विभागाचा कारभार हाकत असतात.
पाणी पुरवठा विभाग जिल्हापरिषदमधील अनियमितता व बोगसगिरीचे माहेरघर आहे. या विभागातील बोगसगिरी झाल्याची चर्चा जिल्हा परिषद सदस्यांकडून होत असते. या संदर्भात काही सदस्यांनी तक्रारी सुद्धा केल्या असून शासनाकडे कारवाईसाठी पाठपुरावा सुरुच आहे. मात्र जिल्हा परिषदकडे बारगळ यांनी चौकशी करण्यात यावी, तोपर्यंत त्यांच्याकडे असलेला पदभार काढण्यात यावा, असे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या पत्रावर मंत्री गुलाब पाटील यांनी सूचना दिल्या आहेत.
गुलाब पाटील यांच्या पत्राकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वीच दुर्लक्ष केले. कुणाला काढायचे आणि कुणाला ठेवायचे याचा सर्वस्व निर्णय जिल्हा परिषदेचा असल्याचे सांगत मंगाराणी अंबुलगेकर यांनी राज्याच्या मंत्र्यांना आव्हान दिले होते. दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सुद्धा बारगळ यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यमंत्र्यांच्या आदेशाला मंगाराणी अंबुलगेकर हे गांभीर्याने घेणार काय? याकडे लक्ष लागले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…