नांदेड

जिल्हा परिषदेची लाखो नागरिकांशी धोकेबाजी

नांदेड, बातमी24ः ग्रामीण भागातील किमान तीस लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या जिल्हा परिषदेला दृष्टीदोष मागच्या काही महिन्यांमध्ये झाला आहे. जिल्हा परिषदेच्या एकाही अधिकार्‍यांमध्ये विकासाचा दृष्टीकोन सापडत नाही. आला दिवस मोजत राहायचे आणि निधी आला, तर टक्केवारीचे कॅलक्युलेशन मांडतात. यास पदाधिकारी तितकेच दोषी असून पदाधिकारी मंडळी सुद्धा पाटर्या व मिळालेल्या खुर्ची मिळेल तितका खिसा गरम करू पाहत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदकडून तीस लाखांहून अधिक नागरिकांशी धोकाबाजी केली जात आहे.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ अशोक शिनगारे यांच्यापर्यंत जिल्हा परिषदेचा प्रशासकीय कारभार चांगला होता. व्हिजेन घेऊन अधिकारी काम करत होती. तसा रिजल्ट राज्याला दाखविला होता. त्यानंतर अशोक काकडे यांना फ ारसे असे काही करता आले नाही. संचिकांमधील व्याकरण व स्वतःच्या प्रमाणिकपणा सिद्ध करण्यात त्यांचे आले तसे वर्षे-दीड वर्षे निघून गेले.प्रभारी तो प्रभारीच कारभार असतो. पदाधिकार्‍यांच्या तालावर प्रभारी अधिकार्‍यास नाचावे लागते.

सहा महिन्यांपासून जिल्हा परिषदेला सीईओ मिळत नाही. हे एकाप्रकारे नेतृत्वाचे अपयश म्हणावे लागेल. जिल्हा परिषदेचा कारभार कागदोपत्री सुरु असला, तरी जिल्हा परिषदेकडे विकासाचे शून्य व्हिजन आहे. काम करण्याची क्षमता या अधिकार्‍यांमध्ये नसल्यासारखे आहे. या काळात शेतकरी असो किंवा सर्वसामान्य हिताचे काम करता येऊ शकते. याचे भान ना अधिकार्‍यांमध्ये आहे ना पदाधिकार्‍यांमध्ये, परिणामी जिल्हा परिषद स्वतःचे आस्तित्व हरपून बसली, काय अशी परिस्थिती आजघडिला आहे. अधिकारी निधी आला, की टक्केवारी तर पदाधिकारी पार्ट्या व मिळेल तसा खिसा गरम करण्याच्या भानगडीत असतात. त्यामुळे जिल्हापरिषदेला झालेला दृष्टीदोष कधी संपणार असा सर्वसामान्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago