नांदेड,बातमी24:- जिल्ह्यात मागच्या काही दिवसांत रुग्णसंख्या घटत आहे. परिणामी अतिगंभीर रुग्णसंख्या ही हळूवारपणे कमी होत चालली आहे. दहा दिवसांपूर्वी अतिगंभीर रुग्णसंख्या अडीचशेच्या पुढे होती.आता 180वर आली.त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आज प्राप्त झाले ल्या 3 हजार 19 अहवालापैकी 665 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 520 तर अँटिजेन तपासणीद्वारे 145 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 80 हजार 182 एवढी झाली असून यातील 67 हजार 611 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 757 रुग्ण उपचार घेत असून 181 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
दिनांक 28 ते 30 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 552 एवढी झाली आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी हदगाव कोविड रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील पिंगळी येथील 80 वर्षाची महिला, किनवट कोविड रुग्णालय येथे किनवट तालुक्यातील बोधडी येथील 85 वर्षाचा पुरुष दिनांक 29 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे किनवट येथील 85 वर्षाचा पुरुष, धर्माबाद येथील 63 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा येथील 55 वर्षाचा पुरुष, उमरी येथील 70 वर्षाचा पुरुष, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय येथे अर्धापूर तालुक्यातील देलूब येथ्ज्ञील 71 वर्षाचा पुरुष, अपेक्षा रुग्णालय येथे आर्शीवाद नगर नांदेड येथील 80 वर्षाची महिला, श्री गणेशा रुग्णालय येथे पटेल कॉलोनी नांदेड येथील 63 वर्षाची महिला, गोदावरी रुग्णालय येथे येथे तुप्पा नांदेड येथील 26 वर्षाचा पुरुष, नारायणा रुग्णालय येथे करीमलकापूर तालुका देगलूर येथील 75 वर्षाचा पुरुष, व्हिजन रुग्णालय येथे पांडुरंगनगर नांदेड येथील 34 वर्षाचा पुरुष, लोटस रुग्णालय येथे अश्रु नगर नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष, दि. 30 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे हदगाव तालुक्यातील तामसा येथील 70 वषाचा पुरुष, तृप्ती नगर नांदेड येथील 37 वर्षाचा पुरुष, देगलूर तालुक्यातील तमलूर येथील 45 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 48 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 55 वर्षाचा पुरुष, हदगाव तालुक्यातील तळेगाव येथील 52 वर्षाचा पुरुष, शक्ती नगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, हदगाव येथील 55 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.32 टक्के आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…