नांदेड,बातमी24 :- कोरोना बाधितांची राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब असून प्रशासन याबाबत नांदेड जिल्ह्यांतर्गत योग्य ती खबरदारी घेत आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पुर्णत: अटोक्यात असून यात नागरिकांची भुमिका खूप महत्वाची आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी अंगिकारावयाची त्रिसुत्री म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ करणे अथवा सॅनिटायजर वापरणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे. याबाबत पुरेशी जनजागृतीही आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. नागरिकांनी जर संयमी जबाबदारी पार पाडली तर जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलायची वेळ येणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तथापि जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत असल्याच्या बातम्या, संदेश हे पुर्णत: चुकीचे असून ज्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर अथवा ट्विटर, इतर कोणत्याही सोशल मिडियावर जर कोणी हे संदेश शेअर केले तर त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…