मुंबई,बातमी24 :- वीज चोरीला आळा घालण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून महावितरणचा महसूल वाढवावा, असे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिलेत.
सुरक्षा व अंमलबजावणी विभागाला बळकटी प्रदान करुन महावितरण कंपनीचा महसूल वाढविण्याच्या अनुषंगाने आज वीज कंपनीच्या फोर्ट मुंबई स्थित कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी भरारी पथकाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
राज्यात वीज चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पूरवठा खंडित करण्यात आला आहे, त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी. अनधिकृत वीज वापराला आळा घालावा. बांधकाम प्रकल्पासाठी तात्पुरत्या वीज जोडणी घेणाऱ्या ग्राहकाला प्रीपेड मीटर व एएमआर मीटर बसवावे, त्या ठिकाणच्या वीज वापराची नियमित तपासणी करावी व वीज चोरीची माहिती देणाऱ्याला बक्षिसे द्यावीत, अश्या सूचना डॉ राऊत यावेळी दिल्यात. सोबतच वीज चोरीला अभय देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत.
खाजगी वीज वितरण कंपन्या व सार्वजनिक वीज वितरण कंपन्या यांचा तुलनात्मक अभ्यास करून वीज चोरीला आळा घालण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करुन ग्राहकांच्या वीज वापरांचे विश्लेषण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. सोबतच या विभागाने वीज चोरी कमी करण्याचे लक्ष ठरवुन त्याची अंमलबजावणी करावी, अशी सूचना त्यांनी केली.
प्रधान ऊर्जा सचिव व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता, सुरक्षा व अमलबजावणी विभागाचे संचालक अनुपकुमार सिंह, संचालक (संचालन) सतिश चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…