महाराष्ट्र

जिल्हयातील दोन अधिकार्‍यांसह 21 जणांना मिळाले आयएएस मानांकन

मुंबई, बातमी24ः बहुप्रतिक्षीत असलेल्या अधिकार्‍यांच्या आयएएस मानांकनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला, असून राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी केडरच्या अधिकार्‍यांना आयएएस मानांकन बहाल करण्यात आले आहे. यात नांदेड जिल्ह्यातील दोन अधिकार्‍यांचा सुद्धा समावेश आहे.

23 अधिकार्‍यांना मानांकनासंबंधी दोन वर्षांपासून हलचाली सुरु होत्या. शासन दरबारी प्रश्न रेंगाळत पडला होता. यातील काही अधिकार्‍यांनी दाद मिळावी, यासाठी न्यायालयाचा दरवाजा सुद्धा ठोठावला होता. अखेर या अधिकार्‍यांच्या आयएएस नामांकनाचे आदेश गुरुवार दि. 3 सप्टेंबर रोजी निर्गमित झाले आहेत.

यात नांदेड जिल्ह्यातील डॉ. अनिल रामोड, सुधाकर तेलंग हे दोन अधिकारी नांदेड जिल्ह्यातील आहेत. तर यापूर्वी दिलीप स्वामी व शिवानंद टाकसाळे यांनी नांदेड जिल्ह्यात सेवा दिली आहे. याचसोबत आयएएस मिळालेल्या अधिकार्‍यांमध्ये यु.ए. जाधव, विजयकुमार फ ड, कान्हू भगाटे, भाऊसाहेब दांडगे, किशन जावळे, शामसुंदर पाटील, संजय चव्हाण, सिद्धाराम सालीमत, रघुनाथ गावंडे, किशोर तावडे, प्रमोद यादव, कविता दिवेदी, मंगेश मोहिते, राजेंद्र क्षीरसागर, प्रवीण पुरी, विनायक मुन, प्रदीपकुमार डांगे, वर्षा ठाकुर, सी.डी. जोशी यांचा समावेश आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago