महाराष्ट्र

ग्राहकांकडे 452 कोटी 20 लाख रूपयांची थकबाकी

नांदेड,बातमी24ः- नांदेड परिमंडळात ऑगस्ट 2020 अखेर 5 लाख 79 हजार 451 घरगुती, वाणिज्यिक व लघुदाब औद्योगिक वीजग्राहकांकडे तब्ब्ल 452 कोटी 20 लाख रूपये थकले आहेत. यामध्ये हिंगोली जिल्हयातील 1 लाख 15 हजार 985 वीजग्राहकांकडे 44 कोटी 54 लाख रूपये, परभणी जिल्हयामधील 1 लाख 57 हजार 433 वीजग्राहकांकडे 298 कोटी 34 लाख रूपये तर नांदेड जिल्हयातील 3 लाख 6 हजार 33 वीजग्राहकांकडे 109 कोटी 33 लाख रूपये थकीत आहेत.

वीजदेयक भरण्यास काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी वीजबील भरण्याचे प्रमाण समाधान कारक नाही. त्यामुळेच नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या निर्देशानुसार एसएमएस, व्हॉटसअप ग्रूप या माध्यमांसोबतच आता वीजग्राहकांना प्रत्यक्ष भेट देत वीजबीलाबाबत समाधान करून आणि मोबाईल व्दारे संवाद साधत वीजबील भरण्याविषयी जनजागृती केली जात आहे.

एप्रिल ते ऑगस्ट अखेर पर्यंत 2 लाख 12 हजार वीजग्राहकांना महावितरणने मोबाईल व्दारे सुसंवाद साधला आहे. याकरिता दैनंदिन कामासोबतच विभागनिहाय खास कर्मचार्‍यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वीजग्राहकांचे समाधान झाल्यामुळे वीजबील भरण्यास वाढता प्रतिसाद मिळत आहे. मागील 14 दिवसात 1 लाख 35 हजार 666 वीजग्राहकांनी 25 कोटी 86 लाख रूपयांचा भरणा केला आहे. यामध्ये 54 हजार 94 वीजग्राहकांनी 9 कोटी 98 लाख रूपये ऑनलाईनच्या माध्यमातून भरले आहेत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago