महाराष्ट्र

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नाहक ‘हत्ती’च बळ आणू पाहणाऱ्यांना आनंदराज आंबेडकर यांची चपराक

मुंबई,बातमी24:-महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या लोकहिताच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील सर्वच घटकांना मिळाला पाहिजे यासाठी सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी अधिकारी काम करत आहे परंतु अशा सर्व कर्मचारी अधिकारी यांना विविध कारण घेऊन काही राजकीय लोक या लोकांची गळचेपी करून त्यांची नाहक बदनामी तसेच त्रास देण्याचे काम करत आहे.अशा बदनामी करणाऱ्या राजकीय लोकांमध्ये समाजकल्याणमुळेच ‘हत्ती’चे बळ आले,असून बोगस हत्तीचे बळ घेऊन वावरणाऱ्या लोकांना रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी चांगलेच फटकारत समाजकल्याणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी हत्तीचे बळ देऊन चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

समाज हिताच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी समाज कल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी यांना बळ देण्यासाठी सर्व आंबेडकरी जनता या विभागाच्या सर्व कर्मचारी , अधिकारी यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि आंबेडकरी जनतेला आवाहन करण्यात येते की सर्व सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग च्या कर्मचाऱ्यांना बहुजनांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे.अशा अधिकारी कर्मचारी यांना एकप्रकारे आनंदराज आंबेडकर यांनी हत्तीचे बळ देत स्वतःच्या स्वार्थासाठी समाजकल्याणमधील अधिकारी यांना वेठीस धरणाऱ्यांचे हत्तीचे बळ शिण करून टाकल्याचे बोलले जात आहे.

 

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago