महाराष्ट्र

तत्पर कार्याची सुंदर संकल्पना सीईओ वर्षा ठाकूर

सीईओ म्हणून काही महिन्यांपूर्वी नांदेड जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून तत्पर कार्याची सुंदर संकल्पना नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न केला.हा त्यांच्या कार्याचा प्रशासनातील जाणतेपणा दर्शवून जातो.

तत्कालीन सीईओ अशोक काकडे यांच्या दीड वर्षामधील निष्क्रिय कारकीर्द जिल्हा परिषदेला सक्रियतेल मारक ठरली,त्यानंतर सीईओची खुर्ची प्रभारी काळात अतिजलद महत्वकांक्षेपोटी वारू उधळल्यालगत राहिली म्हणजे मिनी मंत्रालयाचा कारभार हा आस्तित्व नसल्यासारखा होता.

विभागीय आयुक्त कार्यालयात अनेक वर्षे केलेल्या कार्याचे म्हणजे अनुभवाचे गाठोडे घेऊन जिल्हा परिषद सीईओ म्हणून आलेल्या वर्षा ठाकूर यांनी या भागाचा आगळा वेगळा बदल घडविण्याचा माणस व्यक्त केला. या संकल्पनेतून सुंदर माझे कार्यालय,त्यानंतर सुंदर माझं गाव ही संकल्पना प्रत्यक्षरीत्या अंमलात आणली,इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील सोळा पंचायत समिती कार्यालय आणि मोठ्या लोकसंख्येच्या बहुतांशी ग्रामपंचायती दौरा करत जे काही चांगले करता येऊ शकते ते करण्याचा त्यांचा प्रयत्न सतत सुरू राहतो. दुसऱ्या लाटेची गंभीरता भयंकर असताना रोज कार्यालय रोजचे दौरे खंडित होऊ दिले नाही,यातून त्या कोरोनाची शिकार ही झाल्या पण;त्यांनी रजा टाकून आराम करणे यास फाटा देत कार्यालय बंगल्यावरून चालविले,आणि या आजारातून बाहेर पडल्यानंतर त्या पुन्हा त्याच जोमाने कामाला लागल्या. दुसऱ्या लाटेचा फटका शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागास ही बसला.ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व रुग्णास उपचार देणारी कशी कार्यान्वित होईल यावर भर दिला.भोसी सारखे गाव शंभर टक्के कोरोनामुक्त झाले, या कार्याची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेणे म्हणजे जिल्हा परिषद आणि सीईओ वर्षा ठाकूर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यासारखेच होय.आपल्या कार्यातून आपली ओळख अशी त्यांच्या कामकाजाची पद्धती आहे.ही कार्य पद्धती ही सीईओ वर्षा ठाकूर यांचे भविष्यातील प्रशासकीय भविष्य उज्जवल असल्याचे दर्शविते.

एक महिला सीईओ त्यांना राजकीय आकड्यात काम करणे जमेल का असे अनेक प्रश्न त्यांच्या भोवताली निर्माण केले गेले.पण सीईओ ठाकूर यांनी स्वतःला राजकीय चौकटीत कधी बांधून घेतले ना कोण्या एक पक्ष असा आचार विचार त्यांचा  राहिला नाही,सत्ताधारी प्रमाणे विरोधी पक्ष सदस्यांचे प्रश्न प्रशासकीय पातळीवर सोडविण्याचा त्यांचा कटाक्ष दिसून येतो.जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी असो किंवा जिल्हा भरतील वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी यांच्याशी सीईओ ठाकूर यांचा ऊत्तम समनव्य कायम असतो. अडचणींवर मार्ग काढण्याची तयारी सुद्धा त्यांच्या कार्य पद्धतीची जमेची बाजू म्हणावी लागेल.

प्रशासकीय कामकाजात संचिका रेंगाळत न ठेवण्याचा पायंडा हा गतिमान कारभाराचे उत्तम लक्षणे असते,ते त्यांच्या कार्यातून दिसून येते.निवेदने आली,की लागलीच निकाली

लावल्या जातील, यासाठी लेगच संबंधित अधिकारी यांना बोलावून घेत यावर निर्णय द्या असे आदेशित करतात,जेणेंकरून कामकाजात प्रलंबितपणा राहणार नाही यावर भर असतो

कर्मचारी पातळीवरील ही त्यांचे प्रश्न समजून घेत त्यास न्याय देण्याचा प्रयत्न असतो,2017 सलापासून प्रलंबित पदोन्नतीमधील पदोन्नत्याचा प्रश्न त्यांनी निकाली काढायला सुरुवात केल्याने कर्मचारी ही वर्ग खूष आहे.

सीईओ वर्षा ठाकूर यांची पुढील 12 वर्षे सेवा शिल्लक आहे. त्या सचिव पदावरून निवृत्त होतील,त्यामुळे वेगवेगळ्या खात्याच्या प्रमुख म्हणून त्यांना सेवा करण्याची मोठी संधी आहे,नुकतेच मसुरी येथील प्रशिक्षण ही त्यांचे झाले असल्याने काही महिन्यात त्या एखादा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून जातील,त्यामुळे त्यांच्याकडे सनदी या प्रशासकीय सेवेतील जाणकार भविष्य म्हणून बघितले जाते, प्रश्नांची जाण, सेवेचा अनुभव आणि आणि त्याहीपेक्षा जलद निर्णय घेण्याची हतोटी ही वर्षा ठाकूर यांच्या कार्याची छब्बी आहे. त्यामुळे वर्षा ठाकूर यांनी ओळख अल्पावधीत तत्पर कार्याची सुंदर संकल्पना निर्माण करणाऱ्या अधिकारी अशी जिल्हाभरात निर्माण झाली आहे. आजच्या दिनी त्यांचा जन्मदिन हा त्यांच्यासाठी मंगलदिन आहे. आपल्या कार्यातून सेवेचा ठसा उमटविणाऱ्या सनदी अधिकारी महिलेस खूप शुभेच्छा,उत्तरोत्तर आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो

जयपाल वाघमारे(पत्रकार नांदेड)

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago