जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची डॉक्टर कन्येस कोरोनाचा संसर्ग झाला, असून तिच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. मुलगी कोरोनाशी लढत असताना डॉ. सुधीर देशमुख हे नांदेड येथील मृत्यूदर रोखण्यासाठी योद्धा म्हणून ते पुढे आले आहेत. या भूमिचा पुत्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी 24 तास अलर्ट राहणार असल्याचे डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले.
कोरोनामुळे नांदेडमध्ये मृत्यूचा दर वाढत असल्याची चिंता आरोग्य संचानलयाने घेतली. त्यामुळे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयो अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी नांदेड येथून तात्काळ बदली करत कोल्हापुरला पाठविले आहे. त्याचसोबत त्यांच्या रिक्तपदावर रविवार दि. 26 रोजी डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला.परंतु यास पूर्ण वेळ आदेशात परार्वित करण्यात आले आहे. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालय येथे विदर्भातील डॉ. सिक्रे हे पूर्णवेळ अधिष्ठाता म्हणून रुजू झाले आहे.
मुळचे नांदेड येथील असलेले डॉ. सुधीर देशमुख यांच्या डॉक्टर कन्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर ओैरंगाबाद येथे उपचार सुुरु आहे. कन्येस कोरोना झाल्याचे कारण देत ते काही दिवस थांबू शकले असते. परंतु विलंब न करता ते सोमवारी नांदेड येथे रुजू झाले. नांदेड येथे वाढता कोरोनाचा संसर्ग कमी करण्यावर लक्ष देणार असल्याचे सांगितले. रुग्णालयाची विस्कटलेली घडी बसविणे महत्वाचे आहे. रुग्णांना दर्जेदार भौतिक सुविधा उपलब्ध करून देत आजारातून मुक्त करण्याचे पुढील ध्येय आहे. यासाठी 24 तासात सेवेत हजर राहणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…