नांदेड,बातमी24ः नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. चिखलीकर यांच्या सध्या औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी खासदार चिखलीकर यांच्या चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचसोबत आतापर्यंत माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार माधवराव पाटील जवळगाकवर यांच्यासह भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगाकवर, महानगराध्यक्ष प्रवीण साले आदींना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. वरील राजकीय मंडळीनी कोरोनावर मात केलेली आहे.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून खासदार चिखलीकर हे सुद्धा औरंगाबाद येथेच आहेत. गुरुवारी रात्री खासदार चिखलीकर यांचा स्वॅब कोरेाना पॉझिटीव्ह आला, असून त्यांच्यावर सुद्धा औरंगाबाद येथेच उपचार सुरु आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…