नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दि.5 एप्रिल पासून मसुरी येथे सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातून त्या एकमेव अधिकारी म्हणून सहभागी होणार आहेत.यासाठी त्यांना शासनाने 1 एप्रिल पासून कार्यमुक्त करत असल्याचे आदेश काढले आहेत.
काही महिन्यांपूर्वी भारतीय सनदी अधिकारी पद बहाल झाल्यानंतर वर्षा ठाकूर यांची नांदेड जिल्हा परिषद मुख कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली. सीईओ म्हणून वर्षा ठाकुर यांनी आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला, एकप्रकारे कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये शिस्त लावली. कामाच्या वेळा लावल्या,अधिकारी आणि वेळेत कामे झाली पाहिजे, यावर त्यांचा विशेष कटाक्ष राहिलेला आहे.
वर्षा ठाकूर यांच्यासह राज्यातील 10 अधिकाऱ्यांचा समावेश असून यातील बहुतांशी जण हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, मराठवाड्यातून वर्षा ठाकूर या एकमेव अधिकारी आहेत,ज्या मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीत सहभागी होणार आहेत.
——
सीईओ पदाचा पदभार कुणाकडे?
नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या मसुरी येथे प्रशिक्षण कालावधीत मसुरी येते असणार आहेत, या काळात त्यांच्या जागी पदभार कुणाकडे दिला जाणार याची उत्सुकता असणार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…