महाराष्ट्र

सीईओ वर्षा ठाकुर यांची संकल्पनाः अधिकार्‍यांच्या साप्ताहीक भेटी देतायेत विकासाला गती

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी ग्रामीण भागातील प्रलंबित कामावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. विविध कामे मार्गी लागावे, यासाठी विभाग प्रमुखांना विविध पंचायत समिती दत्तक दिल्या आहेत. या कामासाठी वर्षा ठाकूर यांनी स्वतःसह अधिकार्‍यांची आयोजित केलेली साप्ताहीक भेट ग्रामीण भागाच्या विकासासाठी वरदान ठरत आहे.

वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषदेचा कारभार हाती घेऊन सहा महिने झाले आहेत. या कालावधीत वर्षा ठाकुर यांनी जिल्हा परिषद अंतर्गत सुधारणा केल्यानंतर आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे. सुरुवातील स्वतः ग्रामीण भागातील दौरे केले. विविध कामांचा आढावा घेत असताना प्रलंबित कामे पूर्ण करण्यासह शासनाच्या विविध महत्वकांशी योजना प्रभावीपणे राबविल्या जाव्यात यावर भर दिला. उदा. प्रलंबित घरकुले, पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत विभाग अंतर्गत विविध वित्त आयोगाचे यापूर्वी व नव्याने पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत कामे करण्यावर विशेष भर राहिला आहे.

रखडलेली कामे पूर्ण करणे ही गट विकास अधिकार्‍यांची जबाबदारी असली, तरी विभाग प्रमुखांना विविध तालुके निरीक्षक म्हणून दिल्यास ते कामे अधिक गतीने पुढे जाऊ शकतात, ही बाब ग्राह्य धरून अधिकार्‍यांचे साप्ताहीक भेटी सुुरु केल्या, यासंबंधीचा सकारात्मक बदल स्वतःहून अधिकार्‍यांनी अभ्रिप्राय मांडताना समोर आला आहे. दक्षीण बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सात मुद्दे नमूद करत विविध कामे कशी मार्गी लागल्याचे नमूद केले आहे.

विविध विभाग प्रमुखांनी साप्ताहीक भेटीमुळे काय बदल घडले,या विषयी भाष्य केले आहे. अधिकार्‍यांनी स्वतःहून दाखविलेला प्रतिसाद व दिसून आलेला सकारात्मक परिणाम पाहता, सीईओ वर्षा ठाकुर यांचे साप्ताहीक अभियान ग्रामीण विकासाची कास धरल्याशिवाय राहणार नाही.
——
चौकट
सीईओ म्हणून काम करताना ग्रामीण भागात अधिकत्म कामे कशी चांगले करता येतील, यावर माझा विशेष भर आहे. त्याचाच एक भाग हा अधिकार्‍यांच्या साप्ताहीक भेटी आहेत.

वर्षा ठाकुरःसीईओ जिल्हा परिषद नांदेड.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago