नांदेड, बातमी24ः- काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद अमरनाथ राजूकर यांचा अहवाल सोमवारी पॉझिटीव्ह आला होता.त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्हाधिकारी, आमदार माधवराव जवळगावकर, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ यांच्यासह काही अधिकारी व काही पदाधिकार्यांचे रॅपीड कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
आमदार राजूरकर हे मुंबई येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. त्यानंतर नांदेड येथे कोरोनाची रॅपीड टेसट केली, असता ते व त्यांची कन्या कोरोना पॉझिटीव्ह आली होती. राजूरकर यांची टेस्ट पॉझिटीव्ह येण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला सुद्धा हजेरी लावली होती. या वेळी पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषद प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापालिका आयुक्त डॉ. लहाने, भोकर अतिरक्त पोलिस अधीक्षक श्री. पवार आदींची हजेरी होती. त्यांनतर राजूरकर हे जिल परिषदमधील शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या बंगल्यावर गेले होते. या बंगल्यावरील शिपाई मात्र कोरोना पॉझिटीव्ह आला होता.
त्यानंतर सर्व अधिकारी व पदाधिकारी व संपर्कात आलेल्या काहींनी स्वतः होम क्वॉरंटाईन करून घेतले होते. अशा सर्वांचे रॅपीड टेस्ट घेण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषद प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापालिका आयुक्त डॉ. लहाने, भोकर अतिरक्त पोलिस अधीक्षक श्री. पवार, शिक्षण सभापती संजय बेळगे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कोंढेकर, दिनकर दहिफ ळे, बालाजी पांडागळे, संदीप मुंडे आदींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…